Team Agrowon
डाळिंबाच्या फळात ‘क’ जीवनसत्त्व असतं. डाळिंबाच्या पानांना ‘दाडिमपत्रे’ असंदेखील म्हणतात.
डाळिंबाचा ज्यूस, डाळिंबाचा जाम असे अनेक पदार्थ डाळिंबापासून बनवले जातात. याच डाळिंबाच्या झाडाचे देखील अनेक उपयोग आहेत.
डाळिंबाच्या झाडाचं पानांचा रस रक्तस्तंभक म्हणून वापरतात. डाळींबांच मूळ कृमिनाशक आहे.
डाळिंबाच्या साल हिरड्या मजबूत करण्यासाठी चांगल उपयोग होतो. डाळिंब मूळव्याधीत उपयुक्त आहे.
डाळिंबाच्या झाडांच्या फुलांचा रस नाकातून होणाऱ्या रक्तस्रावात होत असल्यास तो कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
डाळिंब आवडीने खाणाऱ्याची संख्या जास्त आहे. हे फळे भूकवर्धक व पौष्टिक असून, वांती, पित्तप्रकोप, हृदयरोग यात उपयोगी पडतं.
फळाच्या सालीचा काढा घसा दुखण्यावर गुळण्या करण्यासाठी वापरतात. ताप आणि आजारात ताज्या फळांचा रस देतात.
Methi Cultivation : कमी खर्चात, कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या मेथीची लागवड