Pomegranate Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Market : डाळिंबाची आवक कमी; दरात १५ रुपयांची वाढ

Pomegranate Rate : देशातील मृग बहर अंतिम टप्प्यात आला आहे. बाजारपेठेत डाळिंबाची आवकही कमी झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : देशातील मृग बहर अंतिम टप्प्यात आला आहे. बाजारपेठेत डाळिंबाची आवकही कमी झाली आहे. डाळिंबाची मागणी आणि उठावही होत असल्याने गेल्या पंधरा दिवसांत डाळिंबाच्या दरात पुन्हा प्रति किलोस १५ रुपयांची वाढ झाली आहे. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलोस १४० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राजस्थान आणि गुजरात या दोन्ही राज्यांतील बाजारपेठेत डाळिंबांची आवक कमी झाली आहे. उर्वरित राज्यातील मृग बहरातील डाळिंबाची काढणी ७५ टक्के उरकली आहे. त्यामुळे देशांतर्गत डाळिंबाच्या बाजारपेठेत आवक कमी-अधिक होत आहे.

तरीही डाळिंबाला चांगली मागणी असून चांगला उठाव होत आहे. त्यामुळे डाळिंबाला चांगले दर मिळत आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात डाळिंबाच्या दरात प्रति किलोस १५ ते २० रुपयांनी सुधारणा झाली होती.

दरम्यान, फेब्रुवारीत डाळिंबाच्या दरात वाढ होईल, अशी शक्यता डाळिंब संघाने व्यक्त केली होती. त्यानुसार दरात प्रति किलोस १५ रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत सरासरी डाळिंबाचे दर प्रतिकिलोस ३० ते ३५ रुपयांनी वाढले असल्याचे चित्र आहे. देशातील मृग बहरातील डाळिंबाची काढणी आणि विक्री मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल.

हस्त बहरातील डाळिंब लवकरच बाजारात

देशात यंदा हस्त बहराखाली ३५ हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. पाण्याच्या उपलब्धतेअभावी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. परंतु यातूनही पाणी उपलब्ध करून बागा साधल्या आहेत. बहर धरल्यापासून डाळिंबाला पोषक वातावरण मिळाले आहे. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.

सध्या डाळिंबाचे वजन २०० ग्रॅमपेक्षा अधिक आहे. हस्त बहरातील डाळिंब मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशातील बाजारपेठेत विक्रीला येण्याची शक्यता डाळिंब संघाने व्यक्त केली आहे.

दर टिकण्याची शक्यता

बाजारपेठेत डाळिंबाची आवक कमी असून मागणी आहे. मृग बहर संपताच हस्त बहरातील डाळिंब बाजारात येणार आहेत. मुळात, हस्त बहरात पाणीटंचाई असल्याने उत्पादनात घट होण्याचा प्राथमिक अंदाज डाळिंब तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर टिकण्याचा अंदाज आहे.

डाळिंब दर (प्रति किलोस)

एक नंबर प्रत ः १४० रुपये

दोन नंबर प्रत ः ८० ते ९० रुपये

देशातील मृग बहरातील डाळिंबाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे डाळिंबाच्या दरात सुधारणा होत आहे. हस्त बहरातील डाळिंब मार्चच्या मध्यापासून विक्रीला येतील. या दरम्यानही दर चांगले राहतील, अशी आशा आहे.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT