Pomegranate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Export : अमेरिकेतील डाळिंब निर्यात पुन्हा सुरू

Pomegranate Market : अपेडा’, ‘एनपीपीओ’ आणि राज्य कृषी पणन मंडळ व के. बी. एक्सपोर्टतर्फे अमेरिकेत डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘अमेरिकेने घातलेली निर्यात बंदी उठवल्याने डाळिंब उत्पादकांना पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील विकिरण प्रक्रिया करून सुमारे दीड टन डाळिंब निर्यात करण्यात आली आहे,’’ अशी माहिती पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक सतीश वाघमोडे यांनी दिली.

‘‘‘अपेडा’, ‘एनपीपीओ’ आणि राज्य कृषी पणन मंडळ व के. बी. एक्सपोर्टतर्फे अमेरिकेत डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले आहे. पहिली शिपमेंट नुकतीच फ्लोरिडा शहरात रवाना करण्यात आली.

अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. एकूण ३३६ बॉक्सेसमधून १ हजार ३४४ किलो भगव्या प्रतीचे डाळिंब हवाई मार्गे पाठविण्यात आले,’’ असे वाघमोडे यांनी सांगितले.

‘‘निर्यातीसाठीचे माईट वॉश, सोडिअम हायपोक्लोराइड प्रक्रिया, ‘वॉशिंग- ड्रॉइंग प्रक्रिया करून निश्‍चित केलेल्या मानांकनानुसार डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात येत आहे. याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.

भारतीय डाळिंबामध्ये कर्करोगासह अन्य रोगांविरूद्ध लढण्यासाठी लागणारी अँटी ऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे अमेरिकेत डाळिंबाला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक उत्पादकांनी या सुविधेचा वापर करावा,’’ असे आवाहन वाघमोडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Flower Ban : प्लास्टिक फुलांच्या बंदीबाबत विशेष सूचना काढणार; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Rotavator Maintenance: रोटाव्हेटरची योग्य देखभाल कशी करावी? शेतकऱ्यांसाठी सोप्या टिप्स

Fruit Harvesting Tools: फळे काढणीस उपयुक्त आधुनिक साधने

Experimental Farming: तरुणांनी प्रयोगशील शेतीकडे लक्ष द्यावे

Kolhapuri Barrage: कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करा

SCROLL FOR NEXT