Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Soybean Procurement Center : राज्यात सध्या हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ खरेदी केंद्रांना परवानगी दिली. त्यापैकी ३७१ खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात सध्या हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ खरेदी केंद्रांना परवानगी दिली. त्यापैकी ३७१ खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र खरेदीसाठी १२ टक्के ओलाव्याची अट असल्याने आतापर्यंत केवळ ४ हजार ७७० क्विंटलची खरेदी झाली. ओलावा कमी होऊन सोयाबीनची आवक वाढल्यानंतर खरेदी केंद्रांची संख्याही वाढवली जाईल, अशी माहिती पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्र सरकारने यंदा सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. तर खुल्या बाजारात सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ३ हजार ७०० हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गुणवत्तेच्या मालाचा सरासरी भाव ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. हा भाव हमीभावापेक्षा किमान ५०० ते ७०० रुपयाने कमी आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

सरकारने यंदा राज्यात १३ लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदीला परवानगी दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १० लाख टनांची खरेदी होणार आहे. महाराष्ट्रासोबतच सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असलेल्या मध्य प्रदेशातही हमीभावाने खरेदी होणार आहे. मध्य प्रदेश १३ लाख ६० हजार टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करणार आहे. तसेच राजस्थान, कर्नाटक, तेलंगणातही हमीभावाने खरेदी होणार आहे. त्यामुळे बाजाराला एक आधार असेल.

ओलाव्याची अट

सरकारने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी ओलाव्याची अट टाकली आहे. किमान १२ टक्के ओलावा असल्याशिवाय सोयाबीनची खरेदी होणार नाही. पण सध्या बाजारात येणाऱ्या मालामध्ये ओलावा जास्त आहे. तसेच पडत असलेल्या पावसाने ओलावा जास्त येत आहे, असे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रांना १२ टक्क्यांचा ओलावा असलेला माल कमी प्रमाणात मिळत आहे.

आतापर्यंतची खरेदी

सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये १८ टक्क्यांपर्यंत ओलावा येत आहे. काही वेळा हा ओलावा २० टक्क्यांपेक्षाही जास्त राहतो, असे खरेदी केंद्र चालकांनी सांगितले. मात्र खरेदीसाठी ओलाव्याची मर्यादा १२ टक्क्यांची आहे. परिणामी आतापर्यंत केवळ ४ हजार ७७० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली, असे पणन विभागाने सांगितले.

खरेदी केंद्र वाढणार

सध्या १२ टक्के ओलावा असलेला माल कमी येत आहे. त्यामुळे आतापर्यंत ४७८ केंद्रांना परवानगी दिली. त्यापैकी ३७१ केंद्रांवर खरेदी सुरू झाली. मात्र जसे बाजारात कमी ओलावा असलेल्या सोयाबीनची आवक वाढेल तसे खरेदी केंद्रांचीही संख्या वाढवली जाईल. दिवाळीनंतर आणखी खरेदी केंद्रे सुरू होतील, असेही पणन विभागाने स्पष्ट केले.

हमीभावाने विक्रीचे आवाहन

सध्या खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव कमी आहे. मालात ओलावाही जास्त आहे. त्यामुळे कमी खरेदी केंद्रे सुरू आहेत. पण शेतकऱ्यांनी कमी भावात शक्य असेल तर विक्री टाळावी. हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करून हमीभावानेच विक्री करावी. तसेच थांबणे शक्य असेल तर थांबायला हरकत नाही. यापुढच्या काळात सरकारची खरेदी आणि बाजारातील इतर घटकांनुसार दरात बदल दिसून येईल. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावे आणि विक्रीचे नियोजन करावे, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

Kolhapur Millet Festival: कोल्हापुरात मिलेट महोत्सवात ‘उत्पादक ते ग्राहक’ थेट विक्री

Weather Update: राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; उन्हाचा चटका वाढला

Farmers Await Compensation: केळी, कांदा नुकसानीची भरपाई कधी मिळणार?

Nandurbar Water Storage: नंदुरबारात अनेक बंधारे, जलसाठे मुबलक

SCROLL FOR NEXT