Fish Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fish Rate : पापलेट १ हजार, सुरमई ८०० रूपये प्रतिकिलो

Fish Market : सुरमई प्रतिकिलो ८०० ते १०० तर पापलेट १००० ते १२०० रुपयांपर्यंत दर असून इतर मासळीच्या दरात देखील सुधारणा होत आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : दिवाळी सुट्टीत जिल्ह्यात पर्यटकांचा ओढा वाढल्याने जिल्ह्यातील मासळीच्या दरात देखील सुधारणा होताना दिसत आहे. सुरमई प्रतिकिलो ८०० ते १०० तर पापलेट १००० ते १२०० रुपयांपर्यंत दर असून इतर मासळीच्या दरात देखील सुधारणा होत आहे.

जिल्ह्यात १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला प्रारंभ झाला. परंतु ऑक्टोबरपर्यंत समुद्रात वादळसदृश्य स्थिती राहिली. त्यामुळे मासेमारीला तितकीशी गती आली नव्हती. मात्र गेल्या काही दिवसांपासून मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दरम्यान दिवाळी हंगामात सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

पर्यटक हंगाम सुरू झाल्यामुळे मासळीच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग येथून अधिकत्तर मासळी विक्रीकरिता येते. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत आता मासळीच्या दरात सुधारणा झाली आहे.

मासळीचे दर (प्रतिकिलो/रुपयांत)

जिल्ह्यात सध्या सुरमई प्रतिकिलो ८०० ते १०००, पापलेट प्रतिकिलो १००० ते १२००, कोळंबी-५०० ते ७००, सौंदळा -३०० रूपये, बांगडा-२००, मांदेली -१००, बोंबील-१८०, सरंगा-६०० ते ८००, करली-२५०, मोरी -५००, असे दर सध्या आहेत. पुढील आठ ते दहा दिवसांत यामध्ये आणखी सुधारणा होण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tanker Water Supply: पुरंदरमधील १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा

NCP Party Discipline: पक्षातील अनावश्यक हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Pune APMC: भुसार बाजारातील वापर शुल्क वसुलीला स्थगिती

Foodgrain Eligibility Issue: शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांचे ‘रेशन’ बंद?

KVK Ganeshkhind Nursery: गणेशखिंड कृषी संशोधन केंद्रात कलमे, रोपे विक्रीसाठी उपलब्ध

SCROLL FOR NEXT