Papaya Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Market : पपई दरात सुधारणा

Papaya Rate : खानदेशात पपईच्या दरातील सुधारणा सुरूच आहे. दर थेट किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना साडेनऊ रुपये प्रतिकिलो मिळत आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात पपईच्या दरातील सुधारणा सुरूच आहे. दर थेट किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना साडेनऊ रुपये प्रतिकिलो मिळत आहेत. दरातील पडझड मागील आठवड्यातच थांबली होती. यानंतर दरात सतत सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पपईची आवकही अल्प आहे. कारण खानदेशात सर्वाधिक साडेपाच हजार हेक्टरवर पपई लागवड करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात रोगराई व मध्यंतरी घसरलेल्या दरामुळे पपईचे पीक शेतकऱ्यांनी काढले. पपईखालील मोठे क्षेत्र डिसेंबर व जानेवारीत रिकामे झाले. डिसेंबर, जानेवारीत पपईची मागणी नव्हती.

या दोन्ही महिन्यांत पपईला सरासरी कमी दर मिळाला. डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना जागेवर सरासरी तीन रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. तर जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी अडीच रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला आणि दुसऱ्या पंधरवड्यात सरासरी साडेतीन रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. जानेवारीच्या अखेरीस दरातील पडझड थांबली. या महिन्याच्या सुरवातीला दरात सुधारणा सुरू झाली.

मागील काही दिवसांत पपई दरात एक किलोमागे रोज २५ पैसे ते ५० पैसे सुधारणा झाली. जानेवारीच्या अखेरीस पपई दर पाच रुपये प्रतिकिलो होते. सध्या साडेनऊ रुपये प्रतिकिलोचा दर आहे.

सध्या आवक प्रतिदिन २५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी होत आहे. आवक नंदुरबारमधील काही भागात तसेच धुळ्यातील शिरपूर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल व जामनेर भागात होत आहे. कमी दर्जाच्या पपईचे दर साडेसात रुपये प्रतिकिलो आहेत. सध्या दर्जेदार पपई सर्वत्र उपलब्ध आहे.

उत्तर भारतात पाठवणूक

पपई दरात तब्बल अडीच महिन्यानंतर चांगली दरवाढ झाली आहे. पाठवणूक पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान येथे करण्यात येत आहे. नंदुरबारमधील शहादा, धुळ्यातील शिरपूर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील एजंट पपईची पाठवणूक अन्य राज्यांत करीत आहेत. पपईची आवक खानदेशात पुढेही कमीच राहील, असे सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT