Papaya Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Rate: खानदेशात पपई दरात मोठी सुधारणा

Market Update: उत्तरेकडून मोठी मागणी असतानाच उत्पादन कमी दिसत असल्याने खानदेशात पपई दरात मोठी किंवा आश्‍वासक सुधारणा झाली आहे. दर जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना १७ रुपये प्रतिकिलो, असा मिळत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: उत्तरेकडून मोठी मागणी असतानाच उत्पादन कमी दिसत असल्याने खानदेशात पपई दरात मोठी किंवा आश्‍वासक सुधारणा झाली आहे. दर जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना १७ रुपये प्रतिकिलो, असा मिळत आहे.

सध्या दर्जेदार पपई खानदेशात उपलब्ध आहे. पपईची आवक कमी झाली. उत्पादन हवे तसे नसताना कमी दर दिले जात असल्याचा मुद्दा नंदुरबार, धुळ्यात चर्चेत होता. अशात पपई उत्पादक, खरेदीदार आदींची बैठक शहादा (जि. नंदुरबार) येथे झाली. तेथे पपईदर जागेवर किंवा शिवार खरेदीत १७ रुपये प्रतिकिलो देण्याचा निर्णय झाला.

खानदेशात पपईची आवक घटली आहे. मागील हंगामात डिसेंबर व जानेवारीत पपईची मागणी कमी होती. तसेच दर जागेवर प्रतिकिलो सरासरी अडीच रुपये एवढा डिसेंबरमध्ये मागील वेळेस मिळाला. तर जानेवारीतही मागील वेळेस पपईदर कमी होते.

यंदा मात्र कुंभ मेळ्यासह अन्य कारणांनी पपईची मागणी आहे. दुसरीकडे पपईची आवक कमी आहे. सध्या रोज २२ ते २४ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक खानदेशात होत आहे. त्यात राज्यातील बाजारातही पपईची मागणी आहे.

उत्तर भारतातूनही मागणी आहे. यामुळे पपई दर १२ ते १३ रुपये प्रतिकिलोवरून १७ रुपये प्रतिकिलो, असे पोचले आहेत. पपईची खरेदी सध्या पंजाब, हरियाना, काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी भागातील खरेदीदार खानदेशातील एजंटच्या मदतीने करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT