Papaya Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Rate : खानदेशात पपई दर स्थिर

Khandesh Papaya Market : खानदेशात पपई दर मागील महिनाभरापासून स्थिर आहेत. शिवार, खरेदीत किंवा जागेवर शेतकऱ्यांना १५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पपई दर मागील महिनाभरापासून स्थिर आहेत. शिवार, खरेदीत किंवा जागेवर शेतकऱ्यांना १५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. किमान दरही ११ रुपये प्रतिकिलो, असा आहे. आवक सध्या प्रतिदिन सात ट्रक (एक ट्रक १२ टन क्षमता) एवढी आहे. ही हंगामातील नीचांकी आवक असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या पपईची आवक कमी आहे. कारण, कमाल पपई उत्पादकांचे पीक एप्रिल महिन्यात काढण्यात आले. सध्या दोन ते तीन वर्षे सलग उत्पादन देणाऱ्या पपई वाणांच्या क्षेत्रातून आवक सुरू आहे. या पपईस उठाव आहे.

आवक सध्या सात ट्रक (एक ट्रक १२ टन क्षमता) अशी आहे. ही आवक अल्प आहे. मागील वेळेसही जुलै ते सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत पपईची आवक चार ट्रक प्रतिदिन अशीच होती. पुढे ऑगस्ट अखेरपर्यंत आवक वाढणार नाही. सध्या उत्तर प्रदेश, राजस्थान भागात पपईची पाठवणूक सुरू आहे.

दिल्ली, काश्मिरातील पपईची पाठवणूक पूरस्थिती, पावसामुळे प्रभावित झाली आहे. तसेच स्थानिक क्षेत्रात किंवा पुणे, ठाणे भागांतही काही खरेदीदार खानदेशातून पपईचा पुरवठा करून घेत आहेत. पपईचे दर एप्रिल व मे महिन्यात चार रुपये प्रतिकिलो, असे जागेवर मिळत होते. उष्णतेत पपईचे दर कमी होतात. या काळात उत्तर भारतातूनही मागणी कमी असते. यामुळे पपईची आवक एप्रिल व मे महिन्यातच घटली.

जूनमध्ये प्रतिदिन सरासरी १० ट्रक पपईची आवक झाली. सध्या जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा व तळोदा भागात पपईची आवक होत आहे. १२ टन क्षमतेची ट्रक एकाच क्षेत्रात भरत नाही.

कारण फळे हवी तशी पक्व होत नसल्याची स्थिती आहे. ट्रकभर पपईसाठी दोन-तीन भागात जाऊन खरेदीदारांना काढणी, तोलाईची कामे करावी लागत आहेत. या महिन्यात आवकेत आणखी घट झाली आहे. लहान पपई प्रक्रियादार कारखान्यांसमोरही पुरवठ्याचे संकट आहे.

नवीन फळांची आवक सप्टेंबरमध्ये

नव्या हंगामातील पपईचे पीक जोमात आहे. या क्षेत्रातून सप्टेंबरच्या मध्यात आवक वाढेल. नव्या हंगामातील लागवड फेब्रुवारी, मार्च व एप्रिलमध्ये झाली आहे. या पिकांत फळे, फुले लगडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पपईची लागवड खानदेशात यंदा वाढली आहे. ही लागवड एकट्या नंदुरबार जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरवर झाली आहे. नंदुरबारमधील शहादा तालुक्यात पाच हजार हेक्टरवर आहे. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे अडीच हजार हेक्टरवर पपई पीक आहे. धुळ्यात शिरपूर तालुक्यात ७०० हेक्टरवर लागवड झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT