Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : नगर, संगमनेरला कांदा दरात सुधारणा

Onion Market Rate : नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात सातत्याने चढउतार होत आहे. कांदा दरात वाढ होणार असल्याच्या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला, मात्र अजूनही दरात फारशी सुधारणा होताना दिसत नाही.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यातील नगरसह अन्य बाजार समित्यांत कांद्याची आवक सुरूच आहे. शनिवारी (ता. ५) झालेल्या लिलावात नगर, संगमनेर बाजार समितीत कांदा दरामध्ये काहीशी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या नगर जिल्ह्यात एक नंबरच्या कांद्याला २००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात सातत्याने चढउतार होत आहे. कांदा दरात वाढ होणार असल्याच्या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला, मात्र अजूनही दरात फारशी सुधारणा होताना दिसत नाही. शनिवारी झालेल्या लिलावात मात्र प्रतिक्विंटलमध्ये शंभर ते दोनशे रुपयांनी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी सुमारे ७८ हजार गोण्यांची आवक होऊन एक नंबरच्या कांद्याला सतराशे ते दोन हजार शंभर रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल तर मिळाला तर दोन नंबरच्या कांद्याला ११०० ते १७०० रुपये व तीन नंबरच्या कांद्याला ५०० ते ११०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. ४) ११००६ कांदा गोणीची आवक झाली. एक नंबर कांद्याला किमान १ हजार ६०० ते कमाल २ हजार १५१ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला, दोन नंबर कांद्याला १२०० ते १५०० रुपये, तीन नंबर कांद्याला ८०० ते ११०० रुपये बाजरभाव मिळाला.

तर गोल्टी कांद्याला १५१ ते ४०० रुपये भाव मिळाला. नगर जिल्ह्यात कांदा दरात सातत्याने चढउतार होत असले तरी कांद्याचे दर आता वाढणे गरजेचे असल्याचे अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. टोमॅटोचे ११ हजार क्रेटस दाखल झाले होते. एक नंबर टोमॅटो क्रेटला २१०० रुपये बाजारभाव मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत देणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT