Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Procurement : ‘पणन’कडून यंदा कापूस खरेदी नाही

Cotton Market : राज्यात सुरू असलेल्या भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)च्या ११४ पैकी ३४ केंद्रांवर कापसाची आवकच नाही.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : राज्यात सुरू असलेल्या भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)च्या ११४ पैकी ३४ केंद्रांवर कापसाची आवकच नाही. त्यानंतरही मागणी असेल आणि आवकही होणार असेल अशा ठिकाणी पणन महासंघाच्या वाट्याची केंद्रे सीसीआय उघडण्यास तयार आहे, असा दावा सीसीआयकडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत करण्यात आला. परिणामी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून कापसाची खरेदी होण्याची शक्‍यता मावळली आहे.

राज्यात कापसाचे दर दबावात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सीसीआयच्या जोडीला कापूस पणन महासंघाने बाजारात हस्तक्षेप करावा आणि आधारभूत केंद्र उघडावी, अशी मागणी होत होती. या संदर्भाने दबाव वाढल्यानंतर राज्य सरकारही पणन महासंघाच्या माध्यमातून खरेदीस तयार झाले. केंद्र सरकारच्या स्तरावर सीसीआय आणि पणन महासंघ यांच्यात कराराची प्रक्रियाही पार पडली.

त्यानंतरच्या टप्प्यात राज्य सरकारकडून खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे करता यावे याकरिता पणन महासंघाला १०० कोटी रुपयांची बॅंक हमी देखील दिली होती. त्यामुळे खरेदी निश्‍चित होणार असे वाटत असतानाच सोमवारी (ता. ५) मुंबईत झालेल्या बैठकीत पणन महासंघाच्या वाट्याची केंद्रे सीसीआय उघडेल, असे सांगण्यात आले.

त्यामुळे आता पणन महासंघाच्या माध्यमातून होणाऱ्या खरेदीला ब्रेक लागल्याचे मानले जात आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, वस्त्रोद्योग तसेच सहकार खात्याचे सचिव यांची उपस्थिती होती.

=

सीसीआयला कापूस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याकडे ऑनलाइन सातबारा असणे सक्‍तीचे आहे. महाराष्ट्रात ई-पीक पाहणीचे काम अपेक्षित झाले नाही. परिणामी ऑनलाइन सातबारा अपडेट नसल्याने खरेदी प्रक्रियेत त्याची अडचण आहे. त्यामुळे ऑफलाइन सातबारा खरेदीकामी स्वीकारण्यास मंजुरी मिळावी, अशी मागणी सीसीआयकडून बैठकीत करण्यात आली.

महाराष्ट्रात सीसीआयने ११४ केंद्र उघडली आहेत. त्यातील ८० केंद्रावरच कापसाची ११ लाख क्‍विंटल इतकी आवक झाली असून उर्वरित ३४ केंद्रावर एक किलोही कापूस विक्रीसाठी आला नाही. परिणामी कापूस केंद्र वाढविण्याची गरजच वाटत नाही. त्यानंतरही मागणी आणि आवक होणार असेल अशा ठिकाणी आम्ही केंद्र देण्यास तयार आहोत.

यंदा कापसाची प्रत खालावल्याने एफएक्‍यू दर्जाचा कापूस उपलब्ध होणे अशक्‍य आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अशा प्रतीचा कापूस आहे त्यांना खुल्या बाजारातच चांगला दर मिळत आहे. त्यामुळे ते केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणत नाहीत, अशी स्थिती आहे.

- ललीतकुमार गुप्ता, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, भारतीय कापूस महामंडळ

सीसीआयसोबत कराराची प्रक्रिया झाली. परंतु आता एफएक्‍यू दर्जाचा कापूसच येण्याची शक्‍यता नसल्याने पणन महासंघाऐवजी आम्हीच खरेदी केंद्र सुरू करू, अशी सीसीआयची भूमिका आहे. त्यामुळे पणन महासंघाकडून यंदा खरेदीच होणार नाही अशी स्थिती आहे.
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT