Chana Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market : ‘नाफेड’च्या स्टॉकचा हरभरा बाजारावर दबाव

Chana Market Update : बाजारातील हरभरा आवक आता कमी झाली. त्यामुळे काही बाजारांमध्ये हरभरा भावात सुधारणा पाहायला मिळाली. पण हरभरा भावातील सुधारणा पुढील काळात टिकून राहण्याचा अंदाज कमी असल्याचे जाणकार सांगतात.

अनिल जाधव

Pune News : बाजारातील हरभरा आवक आता कमी झाली. त्यामुळे काही बाजारांमध्ये हरभरा भावात सुधारणा पाहायला मिळाली. पण हरभरा भावातील सुधारणा पुढील काळात टिकून राहण्याचा अंदाज कमी असल्याचे जाणकार सांगतात. सरकारकडे हरभऱ्याचा स्टॉक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा स्टॉक सरकार बाजारात आणू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

देशातील बाजारात हरभरा आवक आता कमी झाली. ‘नाफेड’च्या केंद्रांवरही हरभरा खरेदीची गती मंद झाली. सध्या ‘नाफेड’ने २३ लाख टनांपर्यंत हरभरा खरेदी केला. गेल्यावर्षीपेक्षा यंदाची खरेदी ३ लाख टनांनी कमी आहे. पण यंदाही ‘नाफेड’च मोठा स्टॉकिस्ट ठरला. यंदाची खरेदी २३ लाख टन आणि मागील हंगामातील स्टॉक १५ लाख टन, असा एकूण ३८ लाख टन हरभरा ‘नाफेड’कडे आहे.

मागील काही दिवसांपासून बाजारातील हरभरा आवक कमी झाल्यानंतर भावात काहीशी सुधारणा दिसली होती. मुंबई, लातूर, इंदोर, जयपूर, जोधपूर आदी बाजारांमध्ये हरभरा भाव क्विंटलमागे ५० ते १०० रुपयाने वाढला. पण शेतकऱ्यांना मिळणारा भाव कायम होता. सध्या ४६०० ते ५००० रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला जात आहे. केवळ घाऊक विक्रीचे भाव वाढले होते.

स्टॉकिस्ट सक्रिय होण्याची शक्यता

बाजारातील आवक कमी झाल्याने बाजारात स्टॉकिस्ट सक्रिय होत असल्याचीही चर्चा आहे. सरकारकडे हरभऱ्याचा मोठा स्टॉक आहे. यंदाचे वर्ष काहीसे वेगळे असल्याचे व्यापारी सांगतात. यंदा एल निनोची स्थिती आहे. पाऊमान देशात सरासरी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे रब्बीतील हरभरा लागवड आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही शक्यता गृहीत धरून स्टॉकिस्ट बाजारात उतरू शकतात.

सध्या दबाव ‘नाफेड’च्या स्टॉकचा

सध्या बाजारावर सरकारचा दबाव कायम आहे. खरी भीती आहे ती ‘नाफेड’कडील स्टॉकची. ‘नाफेड’ मागील हंगामातील हरभरा स्टॉक पुढील काही दिवसांमध्ये बाजारात आणायची तयारी करत असल्याचीही चर्चा आहे. याकडे सर्व बाजाराचे लक्ष आहे. ‘नाफेड’ने खुल्या बाजारात हरभरा विक्री सुरू केल्यास बाजारावर दबाव राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभऱ्याला उठाव मिळण्याचा अंदाज

यंदा देशात तूर, उडीद आणि मुगाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे भाव चांगले आहेत. तुरीने तर अनेक बाजारांमध्ये १० हजारांचा टप्पा पार केला. उडदाचे भाव ९ हजारांपर्यंत पोहोचले. परिणामी हरभऱ्याला जास्त उठाव मिळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टॉकिस्ट बाजारात सक्रिय झालेच तर त्यांचा नजर मॉन्सून काळातील पाऊसमान आणि रब्बीतील पेरा यावर असेल, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT