Onion Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : नाफेडच्या संचालकांचा दौरा कांदादर पाडण्याच्या नियोजनासाठी?

Onion Market : केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत रब्बी कांद्याची खरेदी ‘नाफेड’कडून मागील महिन्यात गुंडाळण्यात आली.

मुकूंद पिंगळे

Nashik News : केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत रब्बी कांद्याची खरेदी ‘नाफेड’कडून मागील महिन्यात गुंडाळण्यात आली. आता एक महिना उलटत नाही तोच खरेदी करून साठवलेल्या कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर ‘नाफेड’चे व्यवस्थापकीय संचालक रितेश चौहान यांचा नाशिक दौरा झाला; मात्र कमालीची गोपनीयता पाळून त्यांनी भेटी दिल्या. त्यामुळे नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांचा (एमडी) दौरा कांद्याचा दर पाडण्याच्या नियोजनासाठी होता, असा आरोप शेतकरी व शेतकरी संघटनांनी केला आहे.

एकीकडे पारदर्शकता आणल्याचे नाफेडचे संचालक सांगत आहेत. मात्र त्यास स्थानिक अधिकाऱ्यांनी हरताळ फासला आहे. कांदा खरेदीनंतर महिन्यातच बफर स्टॉक वितरण करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र त्याची कुठलीही माहिती दिली जात नाही.

एकीकडे रविवारी (ता. १८) व सोमवारी (ता. १९) व्यवस्थापकीय संचालकांचा दौरा कार्यालयीन असल्याचे अगोदर सांगण्यात आले. मात्र माहिती घेण्याबाबत सोमवारी (ता. १९) नाफेडचे शाखा व्यवस्थापक निखिल पाडदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नंतर तो व्यक्तिगत असल्याचे सांगत अधिक माहिती देण्याचे टाळले. त्यामुळे आता अनेक तर्कवितर्क व शंकांना उधाण आले आहे.

गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांदा उत्पादक अडचणीत आहेत. आता मिळणाऱ्या दराचा काहीसा दिलासा आहे. यापूर्वी ‘नाफेड’ने खरेदी केली त्यात स्पर्धात्मक दर दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताची ही खरेदी झाल्याचे दिसून आलेले नव्हतेच. मात्र आता काही ठिकाणी खरेदीत गोंधळ दिसून येत असल्याची स्थिती आहे.

सलग चार वर्षे कवडीमोल दराने कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुठे थोडाफार कांद्याला दर मिळण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या कांदा विक्रीतून मागील कालावधीतच झालेले नुकसान आता भरून निघण्याची संधी आहे. अशा वेळी बाजारभाव पाडण्यासाठी सरकारने नाफेडच्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तो लगेच बाजारात आणू नये; अन्यथा शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक होईल.
- भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
कांद्याचा बफर स्टॉक मार्केटमध्ये उतरवणे म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे धोरण आहे.
- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT