Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Import Duty : तूर आयातदारांना १.११ कोटींचा दंड

Tur Market : मुंबई (वाशी) बाजार समितीच्या दक्षता पथकाने ही कारवाई केली. तुरीचा साठा नावाशिवा बंदर परिसरात केल्याची माहिती दक्षता पथकाला मिळाल्यानंतर गुरुवारी (ता. २९) रात्री धाड टाकली.

Team Agrowon

Pune News : बाजार समित्यांमधील बाजार शुल्क चोरीतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चर्चा होते. मात्र मुंबई बाजार समितीच्या दक्षता पथकाने, तुरीचे बाजार शुल्क चोरी करणाऱ्या आयातदारांवर मोठी कारवाई करून १ कोटी ११ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या प्रकरणी सुमारे २०० कंटेनरमधील ५ हजार टन तूर ताब्यात घेण्यात आली असून, त्या तुरीची किंमत सुमारे ३४ कोटी रुपये असल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. मुंबई (वाशी) बाजार समितीच्या दक्षता पथकाने ही कारवाई केली.

तुरीचा साठा नावाशिवा बंदर परिसरात केल्याची माहिती दक्षता पथकाला मिळाल्यानंतर गुरुवारी (ता. २९) रात्री धाड टाकली. या धाडीत विनापरवाना व बाजार समितीचा सेस चुकवून तुरीचा कंटेनर परस्पर विक्रीसाठी घेऊन जात असताना जप्त करण्यात आला.

या बाबत सविस्तर माहिती घेतल्यावर दक्षता पथकाने दुबईतून आयात केलेल्या तुरीचे तब्बल २०० कंटेनर त्यामधील ५ हजार टन तूर गोदामात ठेवण्यात आलेला आढळला. या तुरीची किंमत सुमारे ३४ कोटी ६० लाख रुपये असून, यावर १ कोटी ११ लाख ४८ हजार रुपये दंड बाजार समिती प्रशासनाकडून ठोठावण्यात आला आहे.

ही कारवाई बाजार समितीचे सभापती प्रभू पाटील, उपसभापती हुकूमचंद आमधारे यांच्या आदेशाने सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता पथकाचे उपसचिव महेश साळुंके, अनंत पारदुले, संजय खांडेकर, अजित नारंगकर, विनीत उबाळे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT