Maize Import Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Import : जीएम मका आयातबंदीवरून मेक्सिकोचा `यू टर्न`

आपल्या परंपरागत मुळ मका वाणाला जीएमपासून धोका असल्याचं सांगत मेक्सिकोने जीएम मका आयात हळूहळू बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

टीम ॲग्रोवन

पुणेः आपल्या परंपरागत मुळ मका वाणाला (Maize) जीएमपासून धोका असल्याचं सांगत मेक्सिकोने जीएम मका आयात (Maize Import) हळूहळू बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे मेक्सिकोने मवाळ भुमिका घेतली आहे.

मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी एक निर्णय जाहीर केला. त्यानुसार जानेवारी २०२४ पर्यंत मानवी आहारातून जीएम म्हणजेच जणुकीय सुधारित मका टप्प्याटप्प्याने हद्दपार करण्यात येणार आहे. जणुकीय सुधारित मका वाण हे मेक्सिकोच्या मूळ प्राचीन मका वाणांसाठी धोका आहे, असेही ओब्राडोर यांनी सांगितले.

मात्र मेक्सिकोच्या या निर्णयामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला. कारण जगात चीननंतर मेक्सिको दुसऱ्या क्रमांकाचा मका वापर करता देश आहे. तर चीनप्रमाणे मेक्सिकोही जास्तीत जास्त मका अमेरिकेतून आयात करतो. त्यामुळे अमेरिका मेक्सिकोच्या राष्ट्रपतींना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करत आहे.

नुकतेच अमेरिकेचे कृषी सचिव टाॅम विलसॅक यांनी मेक्सिकोला आवाहन करत हा निर्णय लागू न करण्यास सांगितले. या निर्णयाचा अमेरिकेतील शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसेल, असेही विलसॅक यांनी सांगितले. मेक्सिकोने जीएम मका आयात बंदी करण्याआधी दोन्ही देशांना फायदेशीर असा तोडगा काढावा. अन्यथा अमेरिका कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहे, असा इशाराही विलसॅक यांनी दिली.

मेक्सिकोची नरमाईची भुमिका

मेक्सिकोने जीएम मका आयात बंद केल्यास त्याचा मोठा परिणाम अमेरिका-मेक्सिकोच्या व्यापारावर होईल, असाही इशारा विलसॅक यांनी यापुर्वी दिला होता. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर जणुकीय सुधारित म्हणजेच जीएम वाण हे मूळ प्राचीन वाणांना धोका असल्याचे सांगत असलेल्या मेक्सिकोने पुढील काळातही अमेरिकेसोबत व्यापार करण्यास इच्छूक असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्रपती ओब्राडोर यांनी मवाळ भुमिका घेत जीएम मक्याचा वापर केवळ मानवी आहारात होणार नाही. पशुआहारात जीएम मक्याचा वापर सुरुच राहील, अशी भुमिका जाहीर केली.

राष्ट्रपतींचा अजेंडा

जीएम मक्यावर बंदी, हे मेक्सिकोच्या राष्ट्रपतींचे निडवणुकीतील एक आश्वासन होते. अलिकडेच ओब्राडोर म्हणाले होते की, मेक्सिको हा एक स्वतंत्र देश आहे आणि आपल्याला जीएम पिकांची गरज नाही. जीएम मका वाणांचा मेक्सिकोच्या मूळ वाणांवर काय परिणाम होत आहे याचा शास्त्रीय अभ्यास झालेला नाही.

मेक्सिकोला का नको जीएम मका?

हजारो वर्षांपुर्वी मानवाने पहिल्यांदा मेक्सिकोमध्ये मक्याची शेती सुरु केल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून मेक्सिकोकडे डझनभर वंशपरांपरागत वाण असल्याचा दावा केला जात आहे. तसेच या वाणांचा अभिमान मेक्सिकोतील शेतकऱ्यांना आहे. मात्र असे असतनाही मेक्सिकोला स्थानिक गरज पूर्ण करण्यासाठी अमेरिकेच्या पिवळ्या जीएम मक्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जीएम मक्यामुळे येथील वंशपरांपरागत मूळ वाण धोक्यात आल्याची भावनाही येथील शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतकरी मागील काही वर्षांपासून जीएम मक्याची आयात बंद करण्याची मागणी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT