Muskmelon  Agrrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Muskmelon Production : खरबूज उत्पादनास खानदेशात फटका

खानदेशातील कमाल खरबूज उत्पादकांना यंदा कमी उत्पादनात समाधान मानावे लागले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील कमाल खरबूज उत्पादकांना (Muskmelon Producer) यंदा कमी उत्पादनात (Muskmelon Production) समाधान मानावे लागले आहे. एकरी सरासरी पाच ते सहा टन उत्पादनच हाती आले आहे. त्यात दरही प्रतिकिलो ८ ते ११ रुपये एवढेच मिळाल्याने पैशांचे गणितही कोलमडले आहे.

खरबुजाची लागवड यंदा खानदेशात वाढली. जळगाव जिल्ह्यात चोपडा, जामनेर, जळगाव, यावल, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव आदी भागांत मिळून सुमारे ३५० हेक्टरवर खरबूज पीक होते. मागील हंगामात सुमारे २८० हेक्टरवर खरबूज होते.

धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे २५० हेक्टरवर खरबूज पीक होते. मागील हंगामात रब्बीमध्ये खरबुजाचे एकरी १० ते ११ टन उत्पादन अनेकांना मिळाले. परंतु यंदा पाच, सहा ते सात टन एवढेच उत्पादन हाती आले आहे. मार्चमधील रात्रीच्या थंड व दिवसातील उष्ण वातावरणाचा फटका पिकास बसला आहे.

खरबुजाचे दरही यंदा कमीच आहेत. कमाल ११ रुपये प्रतिकिलो दर जागेवर मिळाला आहे. एकरी ६५ ते ७० हजार रुपये खर्च आला आहे. तो वजा करून एकरी ३५ ते ४० हजार रुपये एवढाच नफा काही शेतकऱ्यांना मिळविणे शक्य झाले आहे.

मागील वर्षी खरबुजास मार्च, एप्रिल व मेमध्येदेखील उठाव होता. दर किमान सात व कमाल १३ रुपये प्रतिकिलो, असा जागेवर शेतकऱ्यांना मिळाला होता. परंतु यंदा दरही हवा तसा नाही. दुय्यम दर्जाचे खरबूज अधिकचे तयार झाले. त्यास कमी दर मिळाला. तसेच उत्पादन घटले, अशी माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली.

व्यापाऱ्यांनी दुय्यम फळांची खरेदी टाळली

अनेक शेतकऱ्यांच्या खरबुजाची काढणी खरेदीदारांनी १०० टक्के केली नाही. दर्जेदार खरबूज काढून दुय्यम दर्जाच्या खरबुजाची खरेदी टाळली. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमध्ये भरून खरबुजाची गावोगावी विक्री करावी लागली.अधिकचे श्रम व मजुरीदेखील लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT