Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : भिजलेल्या कापसाला कमाल ६४०० रुपयांचा दर

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.५) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६७९० ते कमाल ७२३० रुपये त रुपये दर मिळाले. मान्सूनोत्तर पावसामुळे वेचणी राहिलेला शेतातील कापूस भिजला.धाग्याची प्रत खराब झाली आहे. परिणामी किमान व कमाल दरामध्ये मोठी घसरण झाली आहे.

सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता.४) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ७२२५ रुपये तर सरासरी ७१४५ रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. २) कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७१०५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १) कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७१०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ३०) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७१९० तर सरासरी ७१८० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. २९) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७१४५ ते कमाल ७२११ तर सरासरी ७१७५ रुपये दर मिळाले. परभणी बाजार समितीत गुरुवारी (ता. ३०) कापसाची ५५५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७३०५ ते कमाल ७३४५ रुपये तर सरासरी ७३३० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २९) कापसाची ४१० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७२०५ ते कमाल ७२३० रुपये तर सरासरी ७२२० रुपये दर मिळाले.

मानवत बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. ५) कापसाची आवक १५०० क्विंटल झाली. तर प्रतिक्विंटल किमान ७०५० ते कमाल ७१८० रुपये तर सरासरी ७१३० रुपये दर मिळाले. तर भिजलेल्या पावसाला किमान ६००० ते कमाल ६४०० रुपये दर मिळाले.सोमवारी (ता. ४) कापसाची ३०५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७२७० रुपये तर सरासरी ७२००रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता. २) कापसाची ९०० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल किमान ७२२५ ते कमाल ७३१० रुपये तर सरासरी ७२७५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १) कापसाची ९८५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७०५० ते कमाल ७२६० रुपये तर सरासरी ७२०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ३०) कापसाची ९७५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७११० ते कमाल ७२९० रुपये तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT