Maize Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate : मलकापुरात मक्याचा कमाल दर २१६५ पर्यंत

Maize Market : मक्याची विदर्भातील सर्वांत मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री चालणाऱ्या येथील बाजारात चांगल्या दर्जाच्या मक्याला २१६५ रुपयांपर्यंत दर मिळाला.

 गोपाल हागे

Buldana News : मक्याची विदर्भातील सर्वांत मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री चालणाऱ्या येथील बाजारात चांगल्या दर्जाच्या मक्याला २१६५ रुपयांपर्यंत दर मिळाला. तर किमान दर १५२० रुपये होता. खरीप हंगामातील मक्याची आवक दिवसाला तीन ते चार हजार क्विंटलपर्यंत होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे २६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली होती. सरासरीच्या १२५ टक्के ही पेरणी अधिक होती. सुरुवातीच्या काळात पीक चांगले जुळून आले होते. मात्र ऑक्टोबरमध्ये ऐन मका काढणीच्या काळात पाऊस झाला. मलकापूर, नांदुरा, चिखली, बुलडाणा, मेहकर, खामगाव अशा विविध मका उत्पादक तालुक्यांमध्ये मक्याची कणसे भिजली.

काही ठिकाणी कोंबही निघाले होते. याचा परिणाम उत्पादनावर झाला. त्यामुळे दरांमध्येही त्याचा फटका बसतो आहे. बुधवारी (ता. १३) बाजारात १०० क्विंटल मका २१६५ रुपये दराने विक्री झाला. किमान १५२० रुपये दराने ५४० क्विंटल, तर सरासरी १७२५ रुपये दराने २९०० क्विंटल मक्याची विक्री झाली.

मलकापुरात आतापर्यंत ३२ हजार क्विंटलची उलाढाल या बाजार समितीत १ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या काळात ३२ हजार ७०० क्विंटलची आवक झाली होती. यंदा मक्याचे उत्पादन कमी झालेले असून, पिकाचे नुकसानही अधिक झालेले आहे. त्यामुळे आवकेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

खरेदीदारांच्या मते, बाजारात आवक झालेला हलका व दुय्यम दर्जाचा मालच कमी दराने विकतो आहे. चांगला मका आजही १८०० ते २१५० दरम्यान विक्री होत आहे. काढणीच्या काळात पाऊस झाल्याने काही मक्याला कोंब फुटले होते. त्यामुळे या मालाचा दर्जा खालावलेला आहे. असा माल प्रत्येक ढिगात कुठे पाच टक्के, कुठे १० टक्क्यांपर्यंत निघतो आहे. काही ढिगात ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झालेले असते, असे मलकापूर येथील मका खरेदीदारांकडून सांगण्यात आले. येत्या काळात मक्याच्या दरात काही प्रमाणात सुधारणा होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मका पिकासाठी एकरी खर्च १८ ते २० हजार रुपये खर्च येतो. यंदा खरिपात एकरी १५ ते २० क्विंटलदरम्यान उतारे लागले. त्यातही पावसाने कणसांचे नुकसान केले होते. सध्याचे बाजारातील दर पाहता शेतकऱ्याच्या हातात जेमतेम पैसे शिल्लक राहतील, अशी शक्यता दिसत नाही. उत्पादन खर्च वाढल्याने व कमी उत्पादनामुळे मक्याचा दरात सुधारणा गरजेचे आहे.
रवींद्र मापारी, मका, उत्पादक, खैरा, ता. नांदुरा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT