Urad Rate Agrowon
मार्केट ट्रेंड

Urad Rate : उडदाचे दर तेजीतच राहणार

आय़ात उडीदही स्वस्त मिळत नाही. त्यामुळे देशातील उडदाच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Team Agrowon

पुणेः देशातील बाजारात सध्या उडदाचा (Urad) तुटवडा जाणवत असून दरही तेजीत आहेत. देशातील उडादाचा पुरवठा लक्षात घेऊन केंद्र सरकारने आयात उडीद खरेदी सुरु केली. मात्र आय़ात उडीदही स्वस्त मिळत नाही. त्यामुळे देशातील उडदाच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

देशात यंदा उडदाची पेरणी कमी झाल्यामुळं उत्पादनही कमी राहीलं. याचा परिणाम उत्पादनावर झाला. यंदा देशात उडदाचं उत्पादन पावसामुळं कमी झालं. परिणामी उडदाचा पुरवठा कमी होऊन दरात वाढ झाली. उडदाचे दर सध्या हमीभावापेक्षा जास्त आहेत. केंद्र सरकारने यंदा उडदासाठी प्रतिक्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र बाजारात उडादाला ६ हजार ८०० रुपयांपासून ८ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

खरिपात उडदाचं उत्पादन घटलं. रब्बीत उडदाचे उत्पादन जास्त होत नाही. त्यामुळे उडदासाठी खरी भीस्त ही खरिपावरच असते. पण उडदाच्या मुख्य हंगामातच पिकाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे उडदाच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. परिणामी स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार त्यांच्याकडील उडादाचा साठा हळूहळू बाजारात आणत आहेत. परिणामी देशातील बाजारात उडदाची उपलब्धता मर्यादीत होत आहे. नेमका हाच घटक बाजारावर  परिणाम करताना दिसत आहे.

सध्या देशात तुटवडा असल्याने पुढील काळातही ही टंचाई कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं दरही वाढतील. भविष्यातील दरवाढ कमी करण्यासाठी सरकारही तयारीला लागलं आहे. सरकारने देशात कमी उडीद उपलब्ध असल्याने आयात उडीद खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी किमान आधारभूत दरही जाहीर केला. मात्र आयात उडदाचेही दर स्वस्त नाही. म्यानमारमधून उडीद आयात सरासरी ८ हजार रुपयांने करावी लागत आहे.
परिणामी उडदाच्या दराला आधार मिळतोय. 

सध्या खरिपातील उडदाला ६ हजार ४०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तर आयात उडदाचे दरही ८ हजार १५० रुपयांपर्यंत आहेत. परिणामी उडदाचे दर कमी होण्याची शक्यता कमीच असून दर टिकून राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT