Pressure on banana rates Agrowon
मार्केट ट्रेंड

Banana Market : केळी दरांवर दबाव

बिहार, मध्य प्रदेश, गुजरातच्या केळीने उत्तरेकडील बाजार व्यापला

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात मागील हंगामाच्या तुलनेत केळीची (Banana)आवक कमी आहे. पण बिहार, गुजरात व मध्य प्रदेशातील केळीची उत्तर भारतातील बाजारातील (Market) आवक वाढली आहे. तसेच सफरचंद व इतर फळांचे दरही बाजारात आवाक्यात असल्याने केळी दरांवर सतत दबाव वाढला आहे. दर्जेदार केळीचे दर खानदेशात ३००० रुपयांवरून १५०० रुपयांवर खाली आले आहेत.

खानदेशात कमी दर्जाच्या केळीला ८००, ९००, १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. कमी दरांचा प्रश्‍नही मागील काही दिवसांत ऐरणीवर आला आहे. आपल्या केळीची व्यापारी किंवा खरेदीदार कमी दरात खरेदी करीत असल्याच्या तक्रारी जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतील शेतकरी करीत आहेत. खानदेशात मागील हंगामात ऑगस्टमध्ये प्रतिदिन सरासरी ४६५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होती. दरही १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. यंदा या महिन्यातील आवक प्रतिदिन सरासरी ३७५ ट्रक आहे. परंतु आवक कमी असताना खानदेशात केळीच्या दरांवर महिनाभरात सतत दबाव वाढला आहे. खानदेशातील केळीला उत्तर भारतात मोठा उठाव असतो. पण देशात गुजरातमधील राजपिपला व परिसर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, बडवानी आणि बिहारमधूनही केळीची आवक सुरू झाली आहे. या भागातूनही याच महिन्यात केळीची आवक वाढली आहे. परिणामी, उत्तरेकडे म्हणजेच पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, काश्मीर येथे खानदेशातील केळीचा उठाव कमी आहे. कारण खानदेशातून उत्तरेकडे केळी पोहोचविण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेत अधिकचा खर्च व वेळ लागतो. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात सुमारे ३१ हजार हेक्टरवर मागील हंगामात लागवड झाली होती. या क्षेत्रात काढणीला याच महिन्यात वेग आला आहे. बऱ्हाणपूर येथील बाजारात मागील १५ दिवसांपासून प्रतिदिन सरासरी २०० ट्रक केळीची आवक झाली आहे. तेथील बाजारात केळीचे रोज लिलाव होत आहेत. तेथेही कमाल दर १५०० रुपये प्रतिक्विंटल, तर किमान दर १००० रुपये असा मिळत आहे, अशी माहिती मिळाली.


सणासुदीमुळे दरातील घसरण थांबणार
देशात विविध भागांत केळीची काढणी, आवक सुरू झाली आहे. परंतु पुढे गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्रोत्सव आदी सणासुदीचे दिवस आहेत. यामुळे देशात केळीची मागणी टिकून राहील. दरातील घसरणही थांबेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT