Soybean Market agrowon
मार्केट ट्रेंड

Soybean Market : खेडा खरेदी जोमात; बाजारात सोयाबीनची आवक मंदावली

स्टॉकिस्ट आणि बियाणे कंपन्या शेतकऱ्यांच्या दारात

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : सोयाबीनची खेडा खरेदी (Soybean Market) सुरू असल्याने व त्यासाठी दलालांसह बियाणे कंपन्यांनीही सहभाग घेतल्याने बाजार समितीमधील सोयाबीनची आवक (Soybean Arrival) मंदावली आहे. खेडा खरेदीत खुल्या बाजारातील भावाच्या समतुल्य दर मिळत असल्याने वाहन खर्चासह इतर खर्च वाचत असल्याने शेतकऱ्यांनीही खेडा खरेदीस प्राधान्य दिले आहे.

केंद्राने सोयाबीनला ४३०० रुपये प्रतिक्विंटल हमीदर जाहीर केला आहे. सध्या खुल्या बाजारात नवीन सोयाबीनला पाच ते साडेपाच हजार रुपयांवर भाव मिळू लागला आहे. स्टॉक लिमिट काढण्यात आल्याने व बियाणे कंपन्या खरेदीसाठी बाजारात उतरल्याने भाव आणखी सुधारण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी दर फारसे सुधारत असल्याचे चित्र नाही. मंगळवारी (ता. १५) स्थानिक बाजारात ५२५० ते ५५०० रुपये भाव मिळाला. आठवड्याभरात यामध्ये दीडशे रुपयांची सुधारणा झाली. हंगामात सोयाबीनची बाजारातील आवक या वेळी ३० ते ४० हजार पोत्यांची राहते, ती यंदा १३ हजारांचाही आकडा पार करू शकलेली नाही. बाजारातील आवक मंदावण्यामागे खेडा खरेदी कारणीभूत असल्याचे बाजार समिती व्यवस्थापन व अडत्यांनी सांगितले.

खुल्या बाजारात खुलणाऱ्या भावाच्या समकक्ष भाव जागेवरच मिळत आहे. त्यामुळे बाजारात येण्यासाठी लागणारा वाहन खर्च, हमाली, तोलाई, अडत (छुपी) वाचत असल्याने शेतकऱ्यांनी खेडा खरेदीस प्राधान्य दिले आहे. बाजारात आवक आणण्यासाठी प्रति क्विंटल प्रति किलोमीटर पैसे मोजावे लागतात. याशिवाय हमाली, तोलाई व इतर खर्च, असे प्रति पोते १४ रुपये ३७ पैसे लागतात. शेतकऱ्यांकडून अडत घेण्यास कायद्याने मनाई असली तरी छुप्या मार्गाने प्रति शेकडा पावणेदोन रुपये अडत आकारली जाते. हा सर्व खर्च वाचत असल्याने खेडा खरेदी जोमात सुरू आहे. त्याचा एकूणच परिणाम बाजार समितीमधील आवकेवर झाला आहे. यामुळे बाजार समितीचाही सेस बुडत असल्याने उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे.

खेडा खरेदीत बाजारात येण्यासाठी व बाजारात लागणारा खर्च वाचत असला तरी अनेकदा शेतकऱ्यांना दलाल व खरेदीदारांकडून पैसे मिळाले नसल्याचे समोर आले आहे. बाजार समितीत खरेदी-विक्री नियमाने होत असून बाजार समिती व्यवस्थापनाचे त्यावर नियंत्रण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोभात न अडकता वास्तविकता जाणून व्यवहार करणे 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT