Anil Jadhao
देशातील सोयाबीन हंगाम सुरु होऊन आता जवळपास दीड महिना होत आला. तसं पाहीलं तर यंदाचा हंगाम सुरुवातीपासूनच सोयाबीन उत्पादकांसाठी आव्हानात्मकच ठरला.
युएसडीएने जगातील सोयाबीन उत्पादन वाढीचाही अंदाज व्यक्त केला आहे. मागील वर्षी जगात ३५२ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते. ते यंदा ३९० दशलक्ष टनांवर पोचेल, असे युएसडीएने म्हटले आहे.
म्हणजेच यंदा सोयाबीन उत्पादन १० टक्क्यांनी वाढणार आहे. मात्र अनेक संस्था आणि जाणकारांना हा अंदाज मान्य नाही.
मागील हंगामात जागतिक खाद्यतेल बाजार तेजीत आली होती. याचा फायदा सोयाबीनलाही मिळाला. परिणामी दर तेजीत आले.
ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीना या देशातील शेतकऱ्यांना मागील वर्षभरात चांगला दर मिळाला. त्यामुळे यंदा ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे.