Cotton Rate Agrowon
मार्केट ट्रेंड

Cotton Rate : कापसाला कोणत्या राज्यात किती दर मिळाला?

शातील बाजारात चालू महिन्यात दरात चढ उतार राहण्याची शक्यता असून पुढील महिन्यापासून दर सुधारू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Team Agrowon


पुणेः देशातील कापूस बाजारात (Cotton Market) आजही दर स्थिर होते. काही बाजारांमध्ये किंचीत चढ उतार झाले. मात्र दरात फार बदल दिसले नाहीत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर काहीसे सुधारले होते. देशातील बाजारात चालू महिन्यात दरात चढ उतार राहण्याची शक्यता असून पुढील महिन्यापासून दर सुधारू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशातील कापूस बाजार आजही काहीसे स्थिर होते. आज कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. देशात उत्तर भारतातील राज्यांमध्ये कापूस दर काहीसे अधिक आहेत. उत्तर भारतात सुताचे दरही चांगले असून लग्नसराईमुळे कापडाला उठाव मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज पंजाबमध्ये कापसाला किमान ८ हजार तर कमाल ९ हजार ६०० रुपये दर मिळाला. तर हरियानात ८ हजार ते ९ हजार ४०० रुपयाने कापसाचे व्यवहार झाले. तर राजस्थानमध्ये किमान ८ हजार आणि कमाल ९ हजार रुपयाने कापूस विकला गेला. 

कर्नाटकात आज किमान ८ हजार ५०० तर कमाल ९ हजार ७५० रुपये आणि गुजरातमध्ये ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयाने कापसाचे व्यवहार झाले. महाराष्ट्रात आज कापसाच्या किमान दरात काहीशी सुधारणा पाहयाला मिळाली. मात्र महाराष्ट्रातील कापूस दर मागील काही दिवसांपासून जवळपास स्थिर आहेत. आज किमान दर ८ हजार ५०० रुपयांवर पोचला होता. तर कमाल दर ९ हजार १०० रुपये मिळाला.

……………
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात आज एक टक्क्यांची सुधारणा पाहायला मिळाली. आज कापसाचे वायदे ८४.९४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. मागील काही दिवासांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत. चीनची मागणी वाढण्याची शक्यता निर्णाण झाल्याने आणि जागतिक कापूस उत्पादन कमी राहिल्याने दरात सुधारणा पाहायला मिळात आहे.
…………..
दरवाढीची आशा
सध्या देशातील कापूस दर आंतरराष्ट्रीय दरापेक्षा जास्त आहेत. पण सध्या चीन, भारत, पाकिस्तान आणि टर्की आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस खरेदी करत आहेत. त्यामुळे कापसाचे दर सुधारत आहेत. परिणामी देशातील कापूस दर पुढील काही दिवसांत सरासरी ९ हजार रुपयांपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT