Orbit Crop Agrowon
मार्केट ट्रेंड

Orbit Crop : ‘ऑरबीट क्रॉप’ ची पाच नवी उत्पादने बाजारात

गेली बावीस वर्षे देशभरासह नेपाळ मध्येही ऑरबीट उद्योग समूहाच्या उत्पादनांची विक्री होते.

टीम ॲग्रोवन

सांगली ः ऑरबीट क्रॉप सायन्सेस कंपनीने (Orbit Crop Sciences Company) नुकतीच पाच नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. डीएसपी,(DSP) झिंकोनिया,(Zhikonia) बोरोप्लस, ओझेड, कॅल्सिओ या ब्रॅंड अंतर्गत ही उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध आहेत. सर्व उत्पादने शासकीय मान्यता प्राप्त असल्याची माहिती ऑरबीट क्रॉप (Orbit Crop) सायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक दीपक राजमाने (Deepak Rajmane) यांनी दिली.

राजमाने म्हणाले, की कंपनीने संशोधनाअंती सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त उत्पादने तयार केली आहेत. यामध्ये डीएसपी हे डायटोमाइट बेस्ड सिलिकॉन आहे. डीएसपीमुळे पिकातील सिलिकॉनचा थर वाढून रोगप्रतिकार शक्ती वाढते.

रसषोशक किडींना अडथळा आणण्याचे काम डायटोमाइटमुळे होते. ग्लायसीनवर आधारित सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये चिलेटेड कॅल्शिअम हे कॅल्सिको तसेच चिलेटेड झिंक हे झिंकोनिया नावाने उपलब्ध आहे. बोरॉन इथॅनोलामाइन हे द्रव जेली स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्य आहे.

ऑक्साइड बेसमधील झिंक हे ओझेड या नावाने उपलब्ध आहे. या उत्पादनासह ऑरबीटची सूक्ष्म अन्नद्रवे, खते, विद्राव्य खते, वनस्पती वाढ संजीवके अशा श्रेणीतील सुमारे शंभरहून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. गेली बावीस वर्षे देशभरासह नेपाळ मध्येही ऑरबीट उद्योग समूहाच्या उत्पादनांची विक्री होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT