Tur Market
Tur Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Tur Market : सरकार यंदा तुरीला चांगला दर मिळू देणार का?

Anil Jadhao 

देशातील बाजारात येत्या काही दिवसांत तुरीची आवक (Tur Arrival) वाढणार आहे. सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे म्यानमारमधून तुरीची आयात (Tur Import) केली जाऊ शकते.

त्यातच सरकारने स्टाॅकिस्टना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. तुरीचे दर जास्त वाढल्यास सरकार बाजारात हस्तक्षेप करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मग या काळात तुरीचा बाजार (Tur Market) कसा राहू शकतो? यंदा तुरीला काय दर (Tur Rate) मिळू शकतो? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. देशांतर्गत बाजारात कापसाचे दर स्थिर


आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरातील चढ-उतार कायम आहेत. आजही बाजार सुरु झाला तेव्हा दरात काहीशी नरमाई दिसून आली होती.

मात्र दुपारपर्यंत दर वाढून पुन्हा शुक्रवारच्या पातळीवर पोहोचले होते. तर देशातील कापूस दर आजही स्थिर होते.

देशातील कापूस दरपातळी आज दुपारपर्यंत प्रति क्विंटल ८ हजार ४०० ते ९ हजार रुपयांच्या घरात होती.

एकंदर स्थिती पाहता कापसाची दरपातळी येत्या काळात ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. 

2. सोयाबीन दराला आधार मिळण्याची शक्यता

 देशातील प्रमुख बाजारांत आज सोयाबीनचे दर टिकून होते. तर काही बाजारांमध्ये दरात क्विंटलमागं ५० रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली.

आज दुपारर्यंत देशातील दरपातळी सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होती.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाचे दर वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर आणखी वाढले

आणि खाद्यतेल बाजाराचा आधार मिळाल्यास देशातील सोयाबीनचे दर वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

3.  संत्र्याचे दर दबावात

राज्यातील बाजारात सध्या संत्र्याचे दर दबावात आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात थंडी वाढलीय. त्यामुळं संत्र्याची मागणीही काहीशी कमी झालीय.

त्यामुळं संत्र्याचे दर सध्या दबावात आहेत. सध्या संत्र्याला ३ हजार ५०० ते ६ हजार रुपये दर मिळत आहे. थंडी कमी होऊन तापमान वाढल्यानंतर संत्र्याला मागणी वाढते.

त्यामुळं या काळात संत्र्याच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

4. करडईच्या भाजीची आवक वाढली

राज्यातील बााजरात सध्या पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दर दबावात आले आहेत. सध्या बाजारात करडईच्या भाजीचीही आवक वाढलीय.

करडईच्या भाजीला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १ हजार ५०० रुपये दर मिळतोय. तर जुडीमध्ये करडईची भाजी शेकडा ५०० ते ७०० रुपये दराने विकली जातेय.

करडईच्या भाजीचे हे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

5.  देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीची आवक वाढत आहे. सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. म्यानमारमधून तूर आयातीसाठी पडतळ आहे.

त्यामुळे म्यानमारधून तूर आयात वाढण्याची शक्यता आहे. तर देशातील बाजारात तुरीची आवक पुढील काळात वाढणार आहे. त्याचा बाजारावर दबाव येऊ शकतो.

पण मागील वर्षीची तूर यंदा शिल्लक नाही. तुरीची पाईपलाईन जवळपास रिकामी आहे. तसेच देशात चांगल्या गुणवत्तेच्या तुरीची मोठी टंचाई आहे.

पुढील काळात तुरीच्या डाळीलाही मागणी राहू शकते.  त्यामुळे शेतकरी चांगल्या गुणवत्तेच्या तुरीची कमी दरात विक्री करण्याची शक्यता कमीच आहे.

पण केंद्र सरकारने नुकतेच देशातील कडधान्य स्टाॅकिस्टना आपल्याकडील स्टाॅकची माहिती देण्यास सांगितले आहे.

त्यामुळं स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार सरकारच्या नियमानुसार तूर खरेदी करु शकतात. त्याचा काहीसा परिणाम बाजारावर जाणवेल.

बाजारात तुरीची आवक वाढल्यानंंतर दरावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी तुरीची विक्री कशी करतात, यावर तुरीचे दर काय राहतील, हे मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

सध्या देशात तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळतोय.

आवक वाढल्यानंतर दर काहीसे दबावात येऊ शकतात. मात्र शेतकऱ्यांनी तूर आवकेचा दबाव न येऊ देता टप्प्याटप्प्याने विक्री केली तर दर टिकून राहतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT