Chana Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Chana Market : देशी हरभऱ्याचे दर वाढतील का?

हरभऱ्याला प्रक्रिया उद्योगांकडून किमान दरात चांगला उठाव मिळतो आहे. या दरात मागणीही चांगली येत आहे. तर काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत. काबुली हरभऱ्याला निर्यातीसाठी मागणी वाढत आहे.

Anil Jadhao 


हरभऱ्याला प्रक्रिया (Chana Processing) उद्योगांकडून किमान दरात चांगला उठाव मिळतो आहे. या दरात मागणीही चांगली येत आहे. तर काबुली हरभऱ्याचे दर (Chana Rate) तेजीत आहेत. काबुली हरभऱ्याला निर्यातीसाठी मागणी वाढत आहे. मग सध्या देशी हरभऱ्याला काय दर मिळत आहे? काबुली हरभऱ्याचे दर किती वाढले? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. कापूस दर स्थिरावले : देशातील कापूस बाजारात सध्या २०० ते ३०० रुपयांचे चढ उतार सुरु आहेत. मात्र आता सीसीआय खरेदीत उतरल्याने किमान दराला आधार मिळाला. कापसाचे किमान दर ८ हजारांपेक्षा कमी होणार नाहीत, असं अभ्यासक सांगत आहेत. तर कापसाला यंदा सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी गरजेप्रमाणं टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

2. सोयाबीनचा बाजार स्थिर : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंड दरात चढ उतार कायम आहेत. दर देशातील बाजारभाव टिकून आहेत. आज देशात सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. तसंच देशातून सोयापेंड निर्यात वाढत आहे. त्यामुळं सोयाबीन बाजाराला आधार मिळतोय. तर पुढील महिन्यात सोयाबीन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
 

3. लसणाचे दर नरमले : हंगामाच्या सुरुवातीला घसरलेले लसणाचे दर मध्यंतरीच्या काळात वाढले होते. मात्र मागील काही दिवसांपासून लसणाचे दर नरमले आहेत. लसणाच्या दरात क्विटंलमागे ५०० ते ६०० रुपयांची नरमाई दिसून आली. सध्या बाजारातील लसणाची आवकी काहीशी मर्यादीत दिसते. मात्र तरीही दर कमी झाले आहेत. सध्या लसणाला २ हजार ८०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. पुढील काही दिवस लसणाचे हे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. 

4. डाळींबाचे दर दबावात : राज्यातील बाजारात डाळींबाची आवक कमी झाली. मात्र दराला आधार मिळालेला दिसत नाही. डाळींबाचे दर सरासरी ६ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. यंदा बदलत्या वातावरणामुळे डाळींबाची गुणवत्ता कमी झाली होती. त्यामुळं दर्जेदार फळांची उपलब्धता घटली. सध्या दर्जेदार फळांना प्रतिकिलो १२० ते २०० रुपये दर मिळतोय. मात्र या फळांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळं डाळींबाचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज डाळींब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
 

5. देशातील बाजारात सध्या गुणवत्तापूर्ण हरभऱ्याची टंचाई जाणवत असल्याचं व्यापारी सांगत आहेत. हरभरा दर सध्या सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. किमान दरात हरभऱ्याला प्रक्रिया उद्योगांकडून चांगला उठाव मिळतो. त्यामुळं नाफडेच्या विक्रीनंतर दर जास्त घसरले नाहीत, असंही व्यापाऱ्यांचं म्हणणये. तर गुणवत्तापूर्ण हरभऱ्याला मुंबई, दिल्ली, इंदोर, जयपूर आदी महत्वाच्या बाजारांमध्ये ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळतोय. मात्र दर अद्यापही हमीभावापेक्षा कमी आहेत. हरभऱ्याच्या दरात पुढली काळात मर्यादीत वाढ होऊ शकते, असेही बाजारातील जाणकारांनी सांगितलं. मात्र काबुली हरभरा सध्या चांगला भाव खातोय. भारतातील काबुली हरभऱ्याला दुबई, सौदी अरेबिया आणि कोलंबो या देशांमधून मागणी वाढली. त्यामुळं मागील आठवडाभरात काबुली हरभऱ्याच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी १२ हजार ते १५ हजार रुपये दर मिळतोय. काबुली हरभऱ्याचे दर वाढल्यानं देशातील बाजारातून उठाव कमी झाला. मात्र निर्यातमागणी वाढली. परिणामी काबुली हरभरा तेजीतच राहिल, असा अंदाज व्यक्त होतोय. देशातील नवा काबुली हरभरा हाती येईपर्यंत दरातील ही तेजी कायम राहील. तर देशी हरभऱ्याचे दर देशातील पेरणी आणि नाफेडच्या विक्रीवर अवलंबून राहतील, असा अंदाज कडधान्य बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT