Wheat Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Wheat Rate : गव्हाची दरवाढ कायम राहणार ?

१ फेब्रुवारीला सरकारने जवळपास ९ लाख टन गहू निविदांच्या माध्यामातून विकल्याची माहीती सुत्रांनी दिली. गहू खरेदीसाठी १ हजार १०० निविदा आल्या होत्या.

Anil Jadhao 

१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन (Soybean) आणि सोयापेंडचे दर (Soya Meal Rate) तेजीत होते. सोयापेंडने आज दुपारपर्यंत ४९२ डाॅलरचा टप्पा गाठत चालू हंगामातील विक्रमी दराचा टप्पा गाठला होता. तर सोयाबीन १५.३२ डाॅलरवर होते.

मात्र देशातील सोयाबीन दरावरील दबाव कायम होता. आजही सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान कायम होते. पण आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ कायम असल्यानं देशातील सोयाबीन दरही सुधारतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी दिला.

२) कापूस दरात चढ उतार

देशातील बाजारात कापूस दर (Cotton Rate) दबावातच आहेत. आजही कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ उतार सुरुच आहेत.

काॅटलूक ए इंडेक्स १००.९५ सेंट प्रतिपाऊंडवर होता. तर कापसाचे वायदे दुपारपर्यंत ८५.८३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. सध्या देशातील दर दबावात असले तरी पुढील काळात दरवाढीसाठी पोषक स्थिती असल्याचं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

३) मका बाजारभाव टिकून

राज्यातील बाजारात सध्या मक्याची आवक वाढत आहे. मात्र सध्या मक्याला हमीभावापेक्षा जास्त दर मिळतोय. रब्बीत मक्याचं क्षेत्र काहीसं जास्त दिसत असलं तरी खरिपातील उत्पादन घटल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

त्यामुळं मक्याला सध्या २०५० ते २२०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काळात सध्याच्या दरात आवकेनुसार २०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

४) तुरीतील तेजी कायम

देशात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. यंदा उत्पादन घटल्यानं दरवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. सध्या अनेक बाजारांमध्ये नवी तूर विक्रीला येत आहे. मात्र आवकेचं प्रमाणं कमी आहे. तुरीच्या दरात सध्या क्विटलमागं १०० रुपयांचे चढ उतार आहेत.

तर सरासरी दरपातळी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. यंदा तुरीला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) सरकारच्या गहू विक्रीने दर नरमतील का?

देशातील गहू दर कमी करण्यासाठी सरकारने खुल्या बाजारात ३० लाख टन गहू विक्रीचा निर्णय घेतला. त्यापैकी सरकारनं विविध राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास २४ लाख टन गहू विक्रीसाठी निवादा मागवल्या होत्या.

१ फेब्रुवारीला सरकारने जवळपास ९ लाख टन गहू निविदांच्या माध्यामातून विकल्याची माहीती सुत्रांनी दिली. गहू खरेदीसाठी १ हजार १०० निविदा आल्या होत्या. २२ राज्यांमध्ये हा गहू विकला गेला. या लिलावात उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील केंद्रावर सर्वाधिक २ हजार ९५० रुपयाने गहू खरेदी करण्यात आला.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये २ हजार ३८० रुपयांपासून गहू खरेदी करण्यात आला. तर सरासरी किंमत २ हजार ४०० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होती. सरकारने बाजारातील दर कमी करण्यासाठी गहू विक्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र लिलावात भारतीय अन्न महामंडळानेच जास्त दरात विकला.

खरेदीदारांना गहू बाजारात आणण्यासाठी वाहतूक आणि लाॅजिस्टीकवरही खर्च करावा लागणार आहे. म्हणजेच गव्हाची किंमत वाढणार. सध्या खुल्या बाजारात गव्हाला २ हजार ७०० ते २ हजार ८०० रुपये दर मिळतोय. गव्हाचे ह दर कायम राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT