Tomato Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटोला सध्या बाजारात काय भाव मिळतोय?

Market Update : सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी १ हजार ८०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीनचे भाव नरमले होते. सोयाबीन बाजारात निराशेचे वातावरण असून त्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. देशातील बाजारातही आज सोयाबीनच्या भावात क्विंटलमागं ५० रुपयांपर्यंत घट दिसून आली.

सरासरी दरपातळी मात्र ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीनचे भाव दबावात असल्याने शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील काही बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झालेली दिसली. काही ठिकाणी आज कापूस १०० रुपयांपर्यंत वाढला होता. बाजारातील कापूस आवक आजही कालच्या तुलनेत कमीच होती.

बाजारातील कमी आवक आणि दुसरीकडे वाढत असलेला उठाव यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून येत आहे. वायद्यांमध्येही कापसाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे यापुढील काळात बाजार समित्यांमध्येही कापसाचे भाव वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

बाजारातील घटती आणि चांगला उठाव, यामुळे टोमॅटोच्या भावात सुधारणा झाली. टोमॅटोचे भाव मागील मागील काही आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत. सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी १ हजार ८०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर सध्या तोडा सुरु असलेले प्लाॅटही कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील, असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

लसणाच्या भावाने विक्रमी टप्पा पार केला. बाजारात लसणाला उठाव चांगला आहे. मात्र लसणाची आवक खूपच कमी आहे. देशातील महत्वाच्या लसूण बाजारांमध्येच आवक कमी आहे. मागील हंगामात शेतकऱ्यांना लसूण फेकून द्यावा लागला होता. परिणामी यंदा लागवडही कमी झाली होती.

तसेच यंदा दुष्काळी स्थितीचा पिकाला मोठा फटका बसला. यामुळे आवक कमी आहे. सध्या लसणाला सरासरी १८ हजार ते २५ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान लसणाला भाव मिळत आहे. लसणाच्या भावातील ही तेजी पुढील काळातही टिकून राहील, असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मक्याच्या भावाला चांगला आधार आहे. मर्यादीत पुरवठा आणि चांगला उठाव असल्याने मक्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये १०० रुपयांची सुधारणा दिसून आली. देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते. सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे.

सरकारही मक्याची हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावाने खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला. त्यामुळे यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT