Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Cotton, Soybean Market : कापूस , सोयाबीन, कांदा तसेच टोमॅटोचे काय आहेत दर?

Market Rate Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, टोमॅटो आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत काहीशी वाढ झाली होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.८० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात आज काहीशी नरमाई दिसून आली.

प्रक्रिया प्लांट्सनी आज सोयाबीनचे भाव ४ हजार ६७५ रुपये प्रतिक्विंटलवर काढले. तर बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

कापसाच्या भावात मागील काही आठवड्यांपासून चढ उतार सुरुच आहेत. आंतराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत ७३.८४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे काहीसे कमी होऊन५६ हजार ८०० रुपये प्रतिखंडीवर होते. दुसरीकडे बाजारातील कापसाची आवक कायम आहे.

तर सूत आणि कापडाला उठाव स्थिर असल्याने बाजारातील भावपातळीही कायम आहे. कापसाला सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात कांद्याच्या भावातील सुधारणा कायम आहे. बहुतांशी बाजारात कांद्याचा भाव आता २ हजार रुपयांपेक्षा जास्त दिसत आहे. कांद्याची मागणी कायम आहे तर दुसरीकडे बाजारातील आवक घटलेली आहे. त्यामुळे दरात तेजी आल्याचे व्यापारी सांगत आहेत.

सध्या कांद्याचा सरासरी भाव २२०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. यापुढील काळातही बाजारातील कांदा आवक कमी होऊ दराला आधार राहील, असाही अंदाज कांदा बाजाराताली व्यापारी व्यक्त करत आहेत.

राज्यातील बाजारात टोमॅटोच्या भावातील सुधारणा कायम आहे. पावसामुळे बाजारातील आवक घटली आहे. तसेच कमी लागवडीचाही आवकेवर परिणाम दिसून येत आहे. पण दुसरीकडे टोमॅटोला चांगला उठाव आहे.

त्यामुळे टोमॅटोचा भाव सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यापुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव सुधारतील, असाही अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

डाळिंबाचे बाजारभाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव तेजीत आहेत. डाळींब पिकाला यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

डाळिंबाचा उचांकी भाव काही ठिकाणी १५ हजार ते काही ठिकाणी २५ हजार रुपये दिसत आहे. पण डाळिंबाला सध्या सरासरी ८ हजार ते १० हजार रुपयांचा सरासरी भाव मिळत आहे. ही भावपातळी आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT