Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत सध्याचे टोमॅटो दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, आले आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आज सुधारणा दिसून आली. सोयाबीनसह सोयापेंडचे भावही वाढले होते. सोयाबीनचे वायदे शुक्रवारच्या तुलनेत आज १.१७ टक्क्यांनी वाढले होते. आज दुपारपर्यंत वायदे १०.२३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान काढला होता. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसात सुधारणा

कापसाच्या भावातही चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आज दुपारपर्यंत शुक्रवारच्या तुलनेत वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ७४ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे ५८ हजार ८५० रुपये प्रतिखंडीवर होते. जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो. तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल. त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याचे भाव टिकून

कांद्याचे भाव आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज काहीसे टिकून होते. बाजारातील कांद्याची आवक मर्यादीत होत आहे. मात्र तरीही वाढलेल्या भावात पुढे मागणी कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. परिणामी कांद्याचे भाव स्थिरावले आहेत. आजही बहुतांशी बाजारात कांद्याला सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कांद्याच्या भावात पुढील काळात चांगली तेजी येऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्याचे भाव टिकून

आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.      

टोमॅटोमध्ये सुधारणा

टोमॅटोच्या भावात चढ उतार सुरु आहेत. टोमॅटोचा भाव मागील ५  दिवसांपासून पुन्हा वाढले आहेत. बाजारातील टोमॅटोची आवक काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव वाढलेला दिसत आहे. वाढलेल्या पावसाचाही टोमॅटोच्या आवकेवर परिणाम दिसत आहे. टोमॅटोचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये २  हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढील काळातही टोमॅटोच्या भावातील चढ उतार कायम राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT