Tur Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीचे दर टिकून राहण्याचा अंदाज

राज्यातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. राज्यासह कर्नाटकात तुरीची काढणी वेगाने सुरु आहे.

Team Agrowon

१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात (Soybean Rate) काहिशी सुधारणा दिसून आली. सोयाबीनचे वायदे (Soybean Futures) १४.९५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४७२ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशात आज सोयाबीनचे दरात किंचित सुधारणा पाहायला मिळाली.

आज सोयाबीनला सरासरी ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. सध्या सोयाबीन भाव दबावात असले तरी जास्त काळ दबाव राहणार नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.

२) कापूस बाजार स्थिर (Cotton rate)

देशातील बाजारात आज कापसाचे भाव स्थिर होते. आज कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. वायद्यांमध्येही दुपारपर्यंत १८० रुपयांची सुधारणा होऊन, वायदे ६३ हजार ५२० रुपये प्रतिखंडीवर होते.

आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली. कापसाचे वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातही कापूस दर तेजीत राहण्यास अनुकूल स्थिती आहे. त्यामुळं दरात वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळून टप्याटप्यानं विक्री सुरु ठेवावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

३) गव्हाचे दर नरमले (Wheat Rate)

देशातील गव्हाचे दर कमी करण्यासाठी नाफेडने खुल्या बाजारात विक्री सुरुच ठेवली. नाफेडनं आता चौथ्या टप्प्यातील लिलाव पार पाडले. सरकारनं चौथ्या लिलावात ४ लाख ३४ हजार टन गहू विकला. तर आतापर्यंत १८ लाख ९७ हजार टन गहू खुल्या बाजारात आणला.

सरकारच्या विक्रीमुळं बाजारातील गव्हाचे भाव कमी झाले. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपये भाव मिळतोय. तर रब्बीतील गव्हाचे भावही तेजीत राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

४) भेंडीचे दर तेजीत

वाढत्या उन्हामुळं सध्या बाजारात भेंडीची आवक घटली आहे. सध्या केवळ पुणे आणि मुंबई बाजारातच भेंडीची आवक १५० क्विंटलच्या दरम्या दिसते. तर इतर बाजारातील आवक सरासरी १० क्विंटलपेक्षाही कमी आहे.

त्यामुळं भेंडीला सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळातही भेंडीच्या दरातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) तुरीचे दर आणखी वाढतील का?

राज्यातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. राज्यासह कर्नाटकात तुरीची काढणी वेगाने सुरु आहे. तुरीची काढणी पुढे जातेय तशी उत्पादनातील घटही स्पष्ट होत आहे. केंद्र सरकारनं यंदा देशात ३६ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला.

तर उद्योगांचा अंदाज ३० लाख टनांचा होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी देत असलेल्या माहितीवरून तूर उत्पादन यंदा ३० ते ३२ लाख टनांच्या दरम्यान राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

देशातील उत्पादन लक्षात घेऊनच आवकेच्या काळात तुरीचे भाव तेजीत आहेत. तूर हाती येण्याच्या आधी शेतकऱ्यांनी दरात तेजी पाहिली. आयात तुरीलाही यंदा चांगला भाव मिळतोय. त्यामुळं शेतकरी लगेच तूर विकताना दिसत नाहीत.

बाजारातील आवक मर्यादीत आहे. सध्याची आवक सरासरीपेक्षा कमी असल्याचं व्यापारीही स्पष्ट करत आहेत. त्यामुळं तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीच्या कमाल दरात काहीसे चढ उतार होत आहेत. मात्र सरासरी दरपातळी टिकून आहे.

सध्या तुरीला बाजारात सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. देशातील घटलेले उत्पादन आणि शेतकऱ्यांची टप्प्याटप्प्याने सुरु असलेली विक्री पाहता तुरीच्या दरातील तेजी टिकून राहिल, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT