Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटो शेतकऱ्यांसाठी आजही तोट्यातच

Market Bulletin : शेतकऱ्यांसाठी टोमॅटो उद्यापही तोट्याचाच ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या किमान भावपातळीत काहिशी वाढ झाली. कमाल भावपातळीही काहिशी वाढली.

Anil Jadhao 

1. कापूस वायद्यांमध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी नरमाई आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८२.४२ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे ५८ हजार ६२० रुपयांवर बंद झाले होते. बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र काहिशी स्थिरावली होती. कापसाला ६ हजार ३०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाचे भाव आणखी काही दिवस स्थिर दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

   
2. सोयाबीनचे भाव काहिसे स्थिरावले होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक वाढत आहे. तर मालामधील ओलावा कमी कमी होत आहे. परिणामी सोयाबीन भावावरील दबाव काहीसा कमी होताना दिसत आहे. सध्या सोयाबीनला ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीनच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

3. देशातील बाजारात मक्याची आवक मर्यादीत होत आहे. चालू खरिप हंगामात मक्याची लागवड तीन टक्क्याने अधिक झाली. पण दुष्काळी स्थितीचा फटका मका पिकालाही बसत आहे. बाजारात मक्याची आवक काहिशी वाढली. त्यामुळे मक्याचे भाव १ हजार ८०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. पशुखाद्यासाठी मक्याला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मक्याचे भाव टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

4. बाजारात सध्या भेंडीला चांगला भाव मिळत आहे. भंडीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. राज्याच्या अनेक भागात सध्या दुष्काळी स्थिती आहे. याचा भेंडी पिकाला फटका बसत आहे. तर भेंडीला मागणी टिकून आहे. त्यामुळे सध्या भेंडीला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काळातही भेंडीचे भाव टिकून राहून शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

5. शेतकऱ्यांसाठी टोमॅटो उद्यापही तोट्याचाच ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या किमान भावपातळीत काहिशी वाढ झाली. कमाल भावपातळीही काहिशी वाढली. पण सरासरी भाव मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वाढायचे नाव घेईना. गेल्या दीड महिन्यापासून टोमॅटो खर्चाला महाग झाला. बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. सरकारी धोरणांचा दबावही टोमॅटोवर येत आहे. बाजारात टोमॅटोला मागील दोन महिन्यांपासून प्रतिक्विंटल ६०० ते ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर एक क्विंटल टोमॅटोचा उत्पादनखर्च १ हजार २०० रुपयांच्या पुढे जातो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणजेच सध्याचा भाव उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे. दुसरीकडे मागील काही आठवड्यांपासून टोमॅटोच्या आवकेत काही प्रमाणात घट झाली. पण भावावर याचा परिणाम होताना दिसत नाही.

शेतकऱ्यांना किलोसाठी ६ ते ९ रुपयांचा भाव मिळत असला तरी ग्राहकांना मात्र बाजारात २० ते ३० रुपये किलोने खरेदी करावी लागत आहे. टोमॅटोच्या लागवड वाढल्या होत्या. पण पुढील काळात टोमॅटो प्लाॅट्सना बदलते वातावरण आणि कमी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील आवक हळूहळू कमी होत जाईल, असा अंदाज आहे. परिणामी टोमॅटोची भावपातळी काहिशी वाढलेली दिसू शकते, असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT