Agriculture Market Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: टोमॅटो दर टिकून; तूर, भोपळा, बटाटा तसेच काय आहेत आजचे लसूण दर?

Daily Commodity Rates: आज आपण टोमॅटो,तूर, भोपळा, बटाटा आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

टोमॅटो बाजार स्थिर

टोमॅटोच्या दरातील सुधारणा स्थिरावली आहे. टोमॅटोचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर दिसत आहेत. टोमॅटोची बाजारातील आवकही सुधारली आहे. तर दुसरीकडे टोमॅटोला उठावही चांगला आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये सध्या १५०० ते २ हजार रुपये आहेत. बाजारातील टोमॅटोची आवक पुढील काळातही मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे पिकाचे नुकसानही वाढते. परिणामी माल कमी मिळतो. त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. 

तूर दबावातच

सरकारची हमीभावाने खरेदी बंद झाल्यानंतर तुरीचे भाव आणखी दबावात आले. त्यातच सरकारने मुक्त तूर आयातीला मुदतवाढ दिली. तसेच पिवळा वाटाण्याची आयातही मुक्त ठेवली आहे. याचा परिणाम दरावर झाला. तुरीचे भाव सध्या हमीभावापेक्षा किमान १५०० रुपयांनी कमी आहेत. तुरीला सध्या ६ हजार ५०० ते ६ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील तुरीची आवक यापुढील काळातही कमीच राहणार आहे. मात्र, सरकारी धोरणांचा दबाव दरावर राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

भोपळ्याला उठाव

बाजारातील दुधी भोपळ्याची आवक मर्यादीत आहे. तर दुसरीकडे भोपळ्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे दुधी भोपळ्याचे भाव टिकून आहेत. भाजीपाला पट्ट्यात झालेल्या पावसाने भोपळा पिकाचेही नुकसान झाले होते. त्यामुळे आवकेवरही परिणाम दिसत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या दुधी भोपळ्याला बाजारात सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तसेच बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. 

बटाटा आवक चांगली

देशात यंदा बटाटा उत्पादन चांगले झाले. देशातील महत्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे बाजारातील बटाटा आवकही चांगली आहे. परिणामी बटाट्याचे दर दबावातच आहेत. बटाट्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

लसूण तेजीत

लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली. बाजारतील लसणाची आवक वाढलेल्या पावासामुळे कमी झाली होती. मात्र लग्नसराई आणि समारंभामुळे लसणाला उठाव चांगला होता. त्यामुळे लसणाच्या भावात दोन आठवड्यांमध्ये सरासरी ५०० ते १ हजार रुपयांची वाढ दिसून आली. लसणाचे भाव राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये सध्या ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. लसणाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते. तसेच त्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT