Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटो पोचला २५०० रुपयांवर; कापूस, सोयाबीन, टोमॅटो, तसेच आल्याचे दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, गवार आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापूस बाजारभाव गेल्या काही आठवड्यांपासून दबावातच आहेत. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात ७१.७४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. वायदे सतत ७१ सेंटच्या आसपास दिसून येत आहेत. देशातील बाजारातही वायदे ५६ हजार २५० रुपये प्रतिखंडीवर होते. कापूस बाजारातील आवक मात्र आता ३० हजार गाठींपेक्षा कमी झाली. काल कापूस आवक २७ हजार ५०० गाठी होती. पण तरीही कापसाचा भाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहीला. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज आहे. 

खरिपातील सोयाबीनची पेरणी सुरु झाली तरीही मागील हंगामातील सोयाबीनचे भाव गेल्या अनेक महिन्यांपासून दबावातच आहेत. सोयाबीनची बाजारातील आवक कमी झाली आहे. मात्र तरीही खाद्यतेल आयात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे ११.८५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारात सोयाबीन ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज आहे. 

टोमॅटोची बाजारातील आवक घटली आहे. पाऊस आणि वाढत्या उष्णतेचा पिकाला फटका बसला. त्यातच यंदा कमी पावसामुळे लागवडीही कमी होत्या. यामुळे आवक कमी दिसत आहे. पण दुसरीकडे टोमॅटोला मिळणारा उठाव चांगला आहे. परिणामी टोमॅटोच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. टोमॅटोचा बाजार सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. यापुढच्या काळात आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

बाजारात गवारची आवक कमीच असून दुसरीकडे गवारचा उठाव चांगला आहे. त्यामुळे गवारचे भाव तेजीत आहेत. गवारच्या उन्हाळी लागडीसाठी अनेक भागात पाण्याची टंचाई होती. आजही पिकाला बहुतांशी ठिकाणी पाणी कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्याचा परिणाम गवारच्या बाजारातील आवकेवर होत आहे. त्यामुळे गवारचा भाव ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. गवारचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे. पण दुसरीकडे मागणी चांगली आहे. बाजारातील आवकच कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला. सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Milk Union Election: गोकुळ दूध संघासाठी आज मतदान

Agricultural Export Opportunities: शेतकऱ्यांना निर्यात संधी उपलब्ध करून देणार: पणनमंत्री रावल

Gokul Election Voting: 'गोकुळ'साठी आज ३५ केंद्रांवर मतदान, चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार?

Soybean Arrival: बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढू लागली

Land Acquisition Rule: भूसंपादन नसल्यास टेंडरही नाही

SCROLL FOR NEXT