Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon podcast : जिऱ्याच्या भावात तब्बल दुप्पट वाढ

Market Bulletin : जिऱ्याच्या भावात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल दुप्पट वाढ झाली. जिऱ्याचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत.

Team Agrowon

1. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये सुधारणा झाली. सोयाबीनचे वायदे १२.८० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड १३.७६ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. तर देशातील बाजार समित्यांमधील भावपातळी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीनची भावपातळी आणखी काही दिवस स्थिर राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.  

   
2. कापूस वायद्यांमध्ये आज काहिशी नरमाई आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज ८७,३० सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ६० हजार ४०० रुपयांवर आले होते. बाजार समित्यांमधील भावपातळी ७ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान होती. देशातील कापूस पिकाला सध्या कमी पाऊस आणि बोंडअळीचा फटका बसत आहे. कापसाचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

3. आल्याचे भाव मागील काही दिवसांपासून काहिसे नरमलेले दिसतात. अनेक बाजारात आले सरासरी ७ हजारांवर आले. तर सरासरी भावपातळी ९ हजारांवर आली आहे. देशातील आले उत्पादन घटले आहे. तर चालू हंगामात आले पिकाला कमी पाऊस आणि वाढलेल्या उष्णतेचा फटका बसत आहे. त्यामुळे आल्याचे भाव स्थिरावण्याची शक्यता आहे, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

4. कोबीची भावपातळी काहिशी नरमली आहे. बाजारातील कोबीची आवक मागील काही दिवसांपासून वाढली आहे. तर कोबीचा उठाव कायम आहे. पण कोबीच्या भावाला आधार मिळाला नाही. सध्या कोबीला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील आवक आणि मागणी पाहता पुढील काही दिवसांमध्ये कोबी भावात काहिशी सुधारणा अपेक्षित आहे, असे व्यापारी सांगतात.

5. जिऱ्याच्या भावात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल दुप्पट वाढ झाली. जिऱ्याचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. वाढलेल्या भावात नफावसुली सुरु झाली. त्यामुळे बाजारात जिऱ्याची विक्री वाढली होती. पण दिवाळीची मागणी पुढील काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे. यामुळे तेजीला आधार दिसत असल्याचे जाणकारांनी सांगितले. चालू हंगामात देशातील जिरा उत्पादनात घट झाली होती. भारतातील जिरा उत्पादन गेल्यावर्षीच्या ४ लाख १४ हजार टनांवरून यंदा ३ लाख ८८ हजार टनांवर स्थिरावले होते. यंदा जिरा पिकाला अतिउष्णता आणि पावसाळी वातावरणाचा मोठा फटका बसला होता. गुजरात आणि राजस्थानमध्ये देशातील जिरा उत्पादन घेतले जाते. मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस आणि एप्रिल महिन्यातील उष्णतेमुळे जिरा पिकाचे नुकसानही झाले.

जागतिक जिरा उत्पादन ४ लाख टनांवर स्थिरावेल, असाही अंदाज व्यक्त केला गेला. मागील हंगामात जिरा उत्पादन ४ लाख ३५ हजार टनांवर उत्पादन झाले होते. यंदा जागतिक बाजारात भारतातून जिऱ्याचा पुरवठा ७ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. सध्या वायद्यांमध्ये जिऱ्याला प्रतिक्विंटल जवळपास ६० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर बाजार समित्यांमधील भावपातळी ५५ हजारांच्या दरम्यान आहे. जिऱ्याचा बाजार पुढील काही दिवस तेजीतच राहू शकतात, असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT