Agriculture Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: मुगाचा बाजार दबावातच; केळी, हिरवी मिरची, भुईमूग तसेच काय आहेत कापूस भाव?

Daily Commodity Rate: आज आपण केळी, भुईमूग, हिरवी मिरची, मूग आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

केळीच्या दरावर दबाव

केळीच्या भावात मागील ५ दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढे मागणीही असल्याचे दिसते. मात्र केळीचे खरेदीदर एका आठवड्यातच ३०० ते ५०० रुपयांनी कमी झाले. सध्या बाजारात केळीला प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. बाजारात इतर फळांची वाढलेली आवक आणि पावसाळी वातावरणामुळे मागणीवर झालेल्या परिणामामुळे केळीचे दरही कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. केळी दरातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे.

भुईमूग शेंग टिकून

बाजारात सध्या भुईमुगाच्या शेंगाची आवक कमी आहे. तर दुसरीकडे भुईमुगाला मागणी चांगली आहे. उन्हाळी भुईमुगाची काढणी अनेक भागात सुरु व्हायची आहे. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी दिसत आहे. सध्या ओल्या भुईमूग शेंगेला ३ हजार ४ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर वाळलेल्या भुईमुगाच्या शेंगेला ५ हजार ते ६ हजारांचा भाव मिळत आहे. बाजारातील आवक आणखी काही दिवस कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भुईमुगाचे दरही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

हिरव्या मिरचीला उठाव

राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे मागणी आहे. त्यामुळे दरही स्थिर दिसत आहेत. सध्या लग्न सराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. त्यामुळे हिरवी मिरची ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयाने विकली जात आहे. हिरव्या मिरचीची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

मुगाचे दर दबावातच

मुगाला चालू हंगामात कमी भाव मिळत आहे. यंदा देशातील मुगाचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. तसेच आयातही चांगली सुरु आहे. त्यामुळे मुगाच्या भावावर दबाव दिसून येत आहे. चालू हंगामात मुगाने हमीभावाचाही टप्पा पार केला नाही. केंद्राने यंदा मुगाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ६५२ रुपये हमीभाव जाहीर केला. तर बाजारात सध्या ७ हजार ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. बाजारातील आवकही पुढील काळात कमी होण्याचा अंदाज आहे. पण उन्हाळी मुगाची आवक पुढे असेल. त्यामुळे मुगाचे भाव पुढील काही आठवडे या पातळीच्या दरम्यानच दिसू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

कापसात चढ उतार 

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. कापसाला देशात उठाव संथ आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी कमी आहे. त्याचा दबाव दरावर आला आहे. त्यामुळे कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. देशात आजही कापूस प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयाने विकला गेला. तर बाजारातील आवक २६ हजार गाठींच्या दरम्यान होती. मात्र कापसाची आयात वाढली आहे. तसेच सीसीआय देखील कापूस विकत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा होईपर्यंत देशात मर्यादीतच चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT