Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Market Update : आज आपण कापूस, सोयाबीन, मका, हळद आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आज दुपापर्यंत चांगलीच वाढ झाली होती. सोयाबीनचे वायदे १२.५४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंडचे वायदे ३९० डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. पण दुपारनंतर दरात काहीशी नरमाई येत गेली.

देशातील बाजारातही दरात क्विंटलमागे २५ ते ५० रुपयांपर्यंतची सुधारणा काही बाजारांमध्ये दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा टिकून राहील्यास याचा फायदा देशात भाव सुधारण्याला होईल, असा अंदाज सोयाबीन बााजारातील अभ्यासकांनी केला. 

कापसाच्या भावात एका मर्यादेत चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारी ७७.५२ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. तर देशातील वायदे काहीसे वाढून ५९ हजार रुपये प्रतिखंडीवर पोचले होते.

बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. तर बाजारातील आवक काल ३७ हजार ५०० गाठींपर्यंत झाली होती. बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा आधार पुढच्या काळात कापूस भावाला मिळेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 


देशात मक्याचा चांगला उठाव आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे.

तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरुच आहे. त्यामुळे मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीच्या भावातील तेजी कायम आहे. यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे. त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही भाव चांगले होते. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोच्या भावातील नरमाई मागील काही दिवसांपासून कायम आहे. टोमॅटोचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये आता एक हजार रुपयांच्याच घरात आहे. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. किमान भाव ६०० रुपयांपासून सुरु होत आहे.

तर सरासरी भावपातळी एक हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT