Soybean Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Soybean Market : सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम

Soybean prices : नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारात आजही चढ उतार दिसून आले. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Aslam Abdul Shanedivan

सोयाबीनच्या भावात चढ उतार

सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या वायद्यांमधील चढ उतार कायम आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीन ११.८८ डाॅलर प्रतिबशेल्सवर होते. तर सोयापेंड ३३३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही प्रक्रिया प्लांट्सचे भाव काही प्रमाणात कमी झाले होते. पण बाजार समित्यांमधील भावपातळी दबावातच असून ४३०० ते ४५०० रुपयांच्या दरम्यान होती. तर बाजातील आवकही टिकून आहे. पुढचे काही आठवडे तरी सोयाबीनच्या भावात असेच चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचे भाव

देशातील बाजारात कापसाचे सरासरी भाव टिकून आहेत. देशात सध्या कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजरातील आवक टिकून आहे. कालची बाजारातील आवक ८३ हजार गाठींवर होती, असे काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. वायद्यांमध्ये मात्र कापसात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ९३.४७ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील मे महिन्याचे वायदे ६३ हजार प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमधील भावात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मका निर्यात मंदावली

देशातील बाजारात मक्याचा भाव टिकून आहे. मक्याला इथेनाॅलसाठी चांगली मागणी आहे. याचा आधार मका भावाला मिळत आहे. नाहीतर आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मक्याचे भाव मंदीत आहेत. देशात मात्र भावपातळी २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा जास्त आहेत. परिणामी देशातून होणारी मका निर्यात मंदावली. पण देशातच मक्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे भावपातळी मक्याचा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

लाल मिरची

लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस काहीशी वाढ होताना दिसत आहे. सध्या बाजारातील आवक कमीच आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे. दुष्काळामुळे यंदा मिरची उत्पादनात  ५ ते १५ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थितीत लक्षात घेऊन स्टाॅकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत. त्यामुळे मिरचीच्या भावात २० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली. सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे १५ हजार ते २५ हजारांचा भाव मिळत आहे. मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोच्या भावात नरमाई

टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई आली आहे. बाजारातील वाढत्या आवकेचा टोमॅटोच्या भावावर परिणाम दिसून आला. टोमॅटोचा भाव काही बाजारांमध्ये ९०० रुपये प्रतिक्विंटलपासून सुरु होत आहे. तर सरासरी भावपातळी १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटोच्या भावात नरमाई आल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT