Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीनचे भाव पुन्हा नरमले; कापूस, सोयाबीन, कांदा, टोमॅटोचे काय आहेत दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, टोमॅटो आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये पुन्हा नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.३१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे. तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि स्वस्त खाद्यतेल आयातीचा दबाव आहे. त्यामुळे सोयाबीन मागील दोन महिन्यांपासून ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीशी नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत ७०.४६ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५८ हजार रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटोचे भाव राज्यातील बाजारात आजही टिकून होते. बाजारातील कमी आणि चांगला उठाव, याचा टोमॅटोच्या बाजाराला आधार मिळत आहे. पावसाचाही टोमॅटो पिकावर आणि बाजारातील आवकेवर परिणाम होत आहे. त्यामुळे टोमॅटोचा बाजार सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

कांद्याचे भाव काहीसे स्थिरावले होते. कांद्याची बाजारातील आवकही काहीशी स्थिरावले होती. तर मागणीही कायम होती. सध्या कांद्याचा सरासरी भाव २३०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. बाजारातील आवक कमी असली तरी वाढलेल्या भावात सध्या कांद्याला उठाव जास्त मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे कांदा भाव स्थिर असल्याचे सांगितले जाते. यंदा शेतकऱ्यांच्या चाळीत कांदा कमी आहे. त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

राज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव टिकून आहेत. काही बाजारात चढ उतार सुरु आहेत. पण त्याचा सरासरी भावपातळीवर तेवढा परिणाम झाला नाही. बाजारातील आवक कमी आहे. तसे पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळेही डाळिंबाची गुणवत्ता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे डाळिंबाला सरासीर ७ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर चांगल्या गुणवत्तेच्या डाळिंबाचे भाव १२ ते १४ हजारांच्या दरम्यान आहेत. डाळिंब बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT