Agriculture Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: ज्वारीच्या दरात चढ उतार सुरु; बटाटा, गाजर, गहू तसेच काय आहेत ढोबळी मिरचीचे भाव?

Daily Commodity Rates: आज आपण ज्वारी, बटाटा, ढोबळी मिरची, गाजर आणि गहू बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

ज्वारीचा भाव स्थिर

ज्वारीचे दर मागील दीड महिन्यात क्विंटलमागे किमान ३०० ते ५०० रुपयांनी कमी झाले आहेत.नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. बाजारातील ज्वारीची आवक वाढत आहे. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये ज्वारीची आवक चांगली आहे. तर दुसरीकडे सध्या ज्वारीला सरासरी दर मिळत आहे. सध्या ज्वारी वाण आणि गुणवत्तेप्रमाणे २३०० ते ३१०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. बाजारातील ज्वारीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्वारीच्या दरावरही दबाव दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

बटाटा दर टिकून

देशातील बटाटा उत्पादन यंदा वाढले आहे. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यांतील उत्पादन वाढले आहे. मात्र बाजारातील बटाट्याचा पुरवठा मागील काही आठवड्यांपासून काहीसा स्थिरावला. बटाट्याला पुढे मागणीही चांगली आहे. त्यामुळे दरही स्थिरावले आहेत. सध्या बाजारात बटाट्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील बटाट्याची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र लग्नसराईमुळे बटाट्याला चांगला उठाव राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बटाटा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ढोबळी मिरचीला उठाव

बाजारात ढोबळी मिरचीची आवक स्थिरावलेली दिसत आहे. तर ढोबळ्या मिरचीला उठावही चांगला आहे. त्यामुळे ढोबळ्या मिरचीचे भाव टिकून आहेत. सध्या ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ढोबळ्या मिरचीची आवक पुढील काळातही कमी राहणार आहे. मे महिन्यानंतर आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर बाजारातील मागणी कायम राहू शकते. त्यामुळे दरालाही आधार मिळेल, असे व्यापारी सांगत आहेत. 

गाजराला मागणी

गाजराला बाजारात चांगला उठाव आहे. तसेच गाजराची आवकही चांगली सुरु आहे. त्यामुळे गाजराचे भाव कमी झाले तरी टिकून दिसत आहेत. राज्यातील बाजारात गाजराची आवक सरासरीच्या पातळीवर सुरु आहे. त्यामुळे सध्या गाजराला प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते १५०० रुपयांचा भाव मिळत आहे. गाजराची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याचा अंदाज आहे. तसेच गाजराला उठावही कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही आठवडे गाजराचा बाजार स्थिर दिसू शकतो, असा असे व्यापाऱ्यांनी सांगितले.  

गव्हाचा भाव टिकून

बाजारात सध्या गव्हाची आवक चांगली सुरु आहे. पण सरकार हमीभावाने खरेदी करत आहे. मध्य प्रदेश बोनसही देत आहे. तर दुसरीकडे गहू उत्पादनात अपेक्षित वाढ होण्याची शक्यता नाही. त्यामुळे गहू दराला आधार आहे. एप्रिलपासून बाजारातील आवक वाढल्यानंतरही गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त आहेत. सध्या गहू २ हजार ५०० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. मे महिन्यात बाजारातील आवक कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गव्हाच्या भावातही वाढ होऊ शकते, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

Poultry Processing By Products: कुक्कुट प्रक्रिया उद्योगातील उप-उत्पादनांपासून मूल्यवर्धन

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

SCROLL FOR NEXT