Agriculture Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: ज्वारीचा बाजार टिकून; तूर, गाजर, हळद तसेच काय आहेत सोयाबीन भाव?

Daily Commodity Rates: आज आपण गाजर, तूर, हळद, ज्वारी आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

गाजराला मागणी

गाजराला बाजारात चांगला उठाव आहे. तसेच गाजराची आवकही चांगली सुरु आहे. त्यामुळे गाजराचे भाव कमी झाले तरी टिकून दिसत आहेत. राज्यातील बाजारात गाजराची आवक सरासरीच्या पातळीवर सुरु आहे. त्यामुळे सध्या गाजराला प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते १५०० रुपयांचा भाव मिळत आहे. गाजराची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याचा अंदाज आहे. तसेच गाजराला उठावही कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही आठवडे गाजराचा बाजार स्थिर दिसू शकतो, असा असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तुरीचा भाव नरमला

वाढती आयात आणि बाजारातील आवक यामुळे तुरीच्या भावात चढ उतार सुरु आहेत. तुरीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई आली होती. तुरीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीची बाजारातील आवक मे महिन्यात कमी होणार आहे. मात्र आयातीचा दरावर काहीसा दबाव राहील. त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसू शकतात. सरासरी दरपातळीत काहीशी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज तूर बाजारातली अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीचे दर स्थिर

हळदीच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. वाढलेल्या भावात उठाव कमी झाल्याने दरातही काहीशी नरमाई पाहायला मिळाली. बाजारातील हळदीची आवकही कायम आहे. सध्या हळदीला सरासरी प्रतिक्विंटल १२ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये हळदीची बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे. तसेच लग्नसराई आणि पुढे सण समारंभामुळे हळदीला चांगला उठाव राहील. त्यामुळे हळदीच्या भावातही सुधारणा दिसून येईल, असे हळद बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ज्वारीला कमी उठाव

ज्वारीचे दर मागील दीड महिन्यात क्विंटलमागे किमान ३०० ते ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारातील ज्वारीची आवक वाढत आहे. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये ज्वारीची आवक चांगली आहे. तर दुसरीकडे सध्या ज्वारीला सरासरी दर मिळत आहे. सध्या ज्वारी वाण आणि गुणवत्तेप्रमाणे २३०० ते ३१०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. बाजारातील ज्वारीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्वारीच्या दरावरही दबाव दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीन दर टिकून

सोयाबीन दर मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक मागील दोन आठवड्यांपासून खूपच कमी झाली. मात्र नाफेडच्या विक्रीचा दबाव दरावर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातही चढ उतार सुरु आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ४ हजार १०० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनची आवक पुढच्या काळात कमी होणार आहे. मात्र नाफेडच्या विक्रीचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा दबाव राहील, असे अभ्यासकांनी सांगितले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT