Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हळदीत काहीशी नरमाई; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहेत तूर दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, गाजर आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये आणि बाजार समित्यांमधील भावात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही आज नरमाई दिसून आली. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी ७२.३९ सेंटवर होते. देशातील वायदेही ५८ हजार ४०० रुपयांवर आहेत. बाजार समित्यांमध्ये भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची काहीशी कमी झाली. कापूस बाजारात अजूनही अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनच्या बाजारातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीशी सुधारणा दिसून आली. बाजारातील चढ उतार कायम असून दबावही आहे. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.५८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२८ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 


राज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव टिकून आहेत. काही बाजारात चढ उतार सुरु आहेत. पण त्याचा सरासरी भावपातळीवर तेवढा परिणाम झाला नाही. बाजारातील आवक कमी आहे. तसे पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळेही डाळिंबाची गुणवत्ता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे डाळिंबाला सरासीर ७ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर चांगल्या गुणवत्तेच्या डाळिंबाचे भाव १२ ते १४ हजारांच्या दरम्यान आहेत. डाळिंब बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. 

गाजराला सध्या चांगला भाव मिळत आहे. बाजारातील कमी आवक आणि चांगला उठाव यामुळे गाजराचे भाव टिकून आहेत. यंदा राज्यातील अनेक भागात लागवडीला पाणीटंचाई भासत होती. परिणाम गाजराची लागवड घटली आणि बाजारातील आवक कमी दिसते, असे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे गाजराला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. गाजर बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

टोमॅटोच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारात सध्या टोमॅटोची आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे टोमॅटोला उठाव चांगला आहे. पावसामुळे आवकेवर आणखी परिणाम होत आहे. त्यामुळे टोमॅटोचा बाजार सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT