Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये दुपारपर्यंत जवळपास २ टक्क्यांनी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत ८२.५० सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर देशातील वायदेही ४६० रुपयांनी वाढले होते. देशातील वायदे ५८ हजार ८०० रुपयांपर्यंत वाढले.

तर बाजार समित्यांमधील भावपातळी ७२०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे.  कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनच्या भावात आज आंतरराष्ट्रीय  बाजारात काहीशी वाढ झाली. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत ११.८० डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंडचे वायदे ३४६ डाॅलर प्रतिटनांवर होते. तर देशातील बाजारात सोयाबीनच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत.

सोयाबीनची बाजारातील आवकही कमी झाली. पण भावपातळी आजही ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे. टोमॅटोचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी झालेला दिसून येत आहे. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे.

टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. किमान भाव ६०० रुपयांपासून सुरु होत आहे. तर सरासरी भावपातळी एक हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात गव्हाच्या भावातील वाढ कायम आहे. आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याने भावाला चांगला आधार मिळत आहे. सरकारची खरेदी सुरु असल्याने हमीभावाचाही आधार आहे. तसेच यंदा देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले.

त्यामुळे गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हरभऱ्याच्या भावातील वाढ कायम आहे. बाजारातील कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे हरभऱ्याला सध्या चांगला भाव आहे. यंदा उत्पादन घटल्याने बाजारातील आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. ऐन आवकेच्या हंगामातही आवक सरासरी गाठत नसल्याने भाववाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ५०० ते ५ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर हरभऱ्याचा हा भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT