Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : मका दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत आजचे हरभरा दर?

Commodity Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, मका, हरभरा आणि हिरवी मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहिशी नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे आज दुुुपारपर्यंत ९.९४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड २९१ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले.

देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात नरमाई

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ६९.३६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायद्यांमध्ये काहिसे चढ उतार सुरु आहेत.

जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला ५४ हजार ९०० रुपये भाव मिळाला. बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाचे भाव कमी झाले आहेत. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मक्याच्या दरात काहिशी सुधारणा

मक्याच्या भावात मागील ३ दिवसांमध्ये काहिशी सुधारणा झाली आहे. मक्याचा सरासरी बाजारभाव १०० ते २०० रुपयांनी कमी झाला. सुरुवातीला मक्यामध्ये ओलावा अधिक होता. त्यामुळे बाजार दबावात आला होता.

आता ओलावा कमी झाल्याने मक्याचा सरासरी भाव १८०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान आहे. मक्याला मागणी असल्याने आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर मका दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

हरभरा दरात नरमाई

देशातील बाजारात हरभरा दरात नरमाई दिसून आली. हरभरा भाव उच्चांकी दरावरून अपेक्षेपेक्षा कमी झाले, असे व्यापारी सांगत आहेत. हरभरा भावावर पिवळा वाटाणा आयातीचा परिणाम होत आहे.

पिवळा वाटाणा स्वस्त असल्याने हरभरा भावही कमी होण्याला मदत झाली. देशातील बाजारात हरभरा भाव सध्या ६ हजार २०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. हरभरा भावात पुढील काळात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

हिरवी मिरची टिकून

राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव टिकून आहेत. बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहिशी वाढलेली दिसते. पण बाजारात मागणीही चांगली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला.

त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे. बाजारात मिरचीचे भाव सध्या ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहिशी वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT