Agriculture Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: गव्हाच्या भावावर दबाव; कैरी, हरभरा, कापूस तसेच काय आहेत सोयाबीन भाव?

Daily Commodity Rates: बाजारातील शेतीमालाच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. गव्हाच्या दरावर वाढलेल्या आवकेचा दबाव जाणवत आहे, तर हरभऱ्याच्या दरावर आयातीचा प्रभाव दिसून येत आहे. सोयाबीन आणि कैरीचे दर टिकून आहेत, तर कापसाच्या दरात सुधारणा दिसत आहे.

Anil Jadhao 

Market Bulletin:

हरभरा दबावातच

सरकारच्या धोरणामुळे हरभरा बाजारावरील दबाव कायम आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवकही सुधारत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आज बाजारात हरभरा ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला गेला. बाजारातील आवकही वाढत आहे. पुढील आठवड्यात आवकेचा दबाव वाढणार आहे. तर दुसरीकडे पिवळा वाटाणा आयातीचा दबाव हरभरा दरावर दिसून येईल. त्यामुळे हरभरा दर पुढील महीना दीड महिना दबावातच राहतील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गव्हाचे भाव दबावात

देशातील बाजरात गव्हाची आवक वाढत आहे. त्यामुळे गव्हाच्या भावात काहीशी नरमाई आली. देशातील महत्वाच्या उपादक राज्यांमध्ये गहू सध्या २ हजार ३०० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. दुसरीकडे सरकारची खरेदीही सुरु झाली. सरकारने हमीभाव २ हजार ४२५ रुपये प्रतिक्विंटलने गव्हाची खरेदी सुरु केली. याचा आधार बाजाराला मिळतच आहे. पुढील काळात गव्हाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात काहीसे चढ उतार दिसतील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कैरीचे दर टिकून

बाजारात कैरी देखील दाखल झाली आहे. बाजारातील कैरीची आवकही वाढत आहे. तर कैरीला उठावही चांगला आहे. तरीही कैरीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई आली. सध्या कैरीला गुणवत्ता आणि वाणानुसार प्रतिक्विंटल सरसारी २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. सध्या कैरीचा हंगाम सुरु झाला. पुढील काळात बाजारातील आवक वाढत जाईल आणि दरही कमी होऊ शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

सोयाबीनचे भाव टिकून

सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. राज्यात सोयाबीनचे भाव काहीसे अधिक दिसत आहेत. सोयाबीनची बाजारातील कमी झालेली आवक, सरकारने थांबवलेली सोयाबीनची वि्क्री यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसत आहे. आजही प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. बाजार समित्यांमधील सोयाबीनचे भावही आज काहीसे स्थिर दिसले. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयाने विकले गेले. सोयाबीनची बाजारातील आवक कमी होत आहे. तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

कापूस दरात वाढ

कापसाच्या भावात झालेली सुधारणा कायम आहे. बाजारातील कापूस आवक कमी झाल्याचा आधार कापूस दराला मिळत आहे. त्यामुळे कापसाच्या भावात तेजी आली आहे. देशातील वेगवगेळ्या बाजारात सध्या कापसाचा भाव ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. सीसीआयच्या कापूस विक्रीचे भावही चांगले आहेत. त्याचा आधार कापूस दराला मिळत आहे. त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. बाजारातील कापसाची आवक पुढील आठवड्यापासून आणखी कमी होत जाईल. त्यामुळे कापसाच्या दरालाही आधार मिळेल, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT