Turmeric Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Turmeric Rate : ऐन सणासुदीत हळदीच्या बाजारावर दबाव; भाव काय राहतील?

Market Rate : देशातील काही भागात जानेवारीपासून हळद दाखल होऊ शकते. ही हळद बाजारात येण्याची आधी बाजारात मागील हंगामातील स्टाॅकची विक्री होऊ शकते, असा अंदाज सध्या बांधला जात आहे.

Anil Jadhao 

Bazar bhav : हळदीच्या भावावर दबाव कायम आहे. देशातील काही भागात जानेवारीपासून हळद दाखल होऊ शकते. ही हळद बाजारात येण्याची आधी बाजारात मागील हंगामातील स्टाॅकची विक्री होऊ शकते, असा अंदाज सध्या बांधला जात आहे. यामुळे हळदीच्या भावावर दबाव असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

देशातील हळद लागवड आणि पिकावर यंदा दुष्काळी परिस्थितीचा परिणाम होत आहे, असे अहवाल मागील काही महिन्यांपासून येत आहेत. पण सप्टेंबर महिन्यात काही भागात चांगला पाऊस झाला. यामुळे हळद पिकाला काहीसा आधार मिळाला, असेही अहवाल अनेक संस्थानी दिले. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात अपेक्षेपेक्षा कमी घट होऊ शकते, असा अंदाज दिला जात आहे. तसं पाहीलं तर हळदीच्या उत्पादकतेला या पावसाचा किती फायदा होईल, हे पुढील काळात कळेलच. पण हळद पिकाला वातावरण काहीसे पोषक असल्याची चर्चा बाजारात आहे. यामुळे हळदीचे व्यवहार धीम्या गतीने होत आहेत.

देशातील हळदीचा नवा माल जानेवारी ते मार्च या दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात सुरु होतो. या काळात पिकाला पोषक वातावरण राहते का? यावरूनही बाजार ठरेल. सध्याचा हवामान विभागाचा आणि इतर सस्थांचा अंदाज पाहीला तर तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. याचा फटका हळद पिकाला बसू शकतो. परिणामी हळद उत्पादकतेतही घट दिसू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशातील हळद बाजाराचा आलेख बघितला तर सुरुवातीपासून बाजाराला आधार देणाऱ्या घडामोडी घडत होत्या. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारातून मागणी वाढली होती. त्यामुळे निर्यात जवळपास २५ टक्क्यांनी वाढली. तसेच हळदीच्या उत्पादनातही घट येण्याचा अंदाज आहे. उत्पादन नेमकी किती कमी होईल याबाबत वेगवेगळे अंदाज आहे. पण महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये लागवड कमी होण्यासह उत्पादकतेला फटका बसणार आहे.

दराचा विचार केला तर मागील काही दिवसांपासून भाव स्थिर आहेत. बाजार समित्यांमध्ये हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर वायद्यांमध्ये १३ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान हळदीचे व्यवहार होत आहेत. हळदीच्या बाजारात एखादी तेजी येईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. पण बाजारात विक्री कशी होते यावर पुढील काळात भाव अवलंबून असतील, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT