Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: कांदा बाजारभाव टिकून; हळद, केळी, कापूस तसेच काय आहेत सोयाबीन भाव

Daily Commodity Rates: आज आपण हळद, केळी, कांदा, सोयाबीन आणि कापूस पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

हळदीचा भाव चढ उतार

देशातील बाजारात हळदीच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत. नव्या हळदीची बाजारात आवक वाढत आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून आला. यंदा देशात हळदीची लागवड वाढली आहे. पिकावर किड रोगांचा परिणाम झाला तरीही देशातील हळद उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्तच राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे नवा माल बाजारात दाखल झाल्यानंतर दरात आतापर्यंत २ हजार ते ३ हजारांची नरमाई आली. आज हळदीला सरासरी ११ हजार ते १२ हजारांचा भाव मिळाला. बाजारातील हळदीची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. पण यंदा हळदीच्या भावात मोठी नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे हळदीच्या भावात काहीसे चढ उतार दिसतील, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

केळी दरात सुधारणा

केळी भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली. केळीला कुंभ मेळ्यानिमित्त उठाव मिळत आहे. यामुळे केळी दरात सतत वाढ झाली. यात आवक कमीच आहे. पिलबाग केळीमधूनही दर्जेदार केळीची आवक सध्या होत आहे. राज्यभरात केळीच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून केळीचे भाव १८०० रुपयांपर्यंत पोचले. केळीच्या आवकेत पुढील महिनाभरानंतर वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याचाही परिणाम दरावर दिसेल, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याचे भाव टिकून

देशातील बाजारात कांद्याच्या भावातही चढ उतार सुरुच आहेत. बाजारातील आवक वाढल्याने कांदा भाव मागील ४ दिवसांमध्ये काहीसे नरमले आहेत. मात्र अजूनही कांदा आवकेचा दबाव वाढलेला नाही. कांद्याची आवक तुलनेत स्थिर दिसत आहे. कांद्याला उठावही चांगला मिळत आहे. त्यामुळे कांद्याचा सरासरी बाजारभाव १७०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. कांद्याच्या बाजारातील ही परिस्थिती आणखी काही आठवडे कायम राहील. उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरात बदल दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी नरमाई आली होती. सोयाबीनचे वायदे शुक्रवारी १०.४९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंडचे वायदे ३०१ डाॅलर प्रतिटनांपर्यंत नरमले होते. देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे. देशातील सोयाबीनची भावपातळी आजही ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ३३० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावातच राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.  

कापूस स्थिरावला

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कापसाचे वायदे ६५.६३ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. कापसाच्या वायद्यांमध्ये आठवड्याच्या शेवटी नरमाई दिसून आली. देशात कापूस बाजारभाव स्थिर आहेत. आजही कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. तर बाजारातील कापूस आवक १ लाख ४० हजार गाठींच्या दरम्यान होती. कापसाची आवक फेब्रुवारी माहीन्यात आणखी कमी होण्याचा अंदाज आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT