Onion Auction Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा भाव स्थिरावला

Onion Rate : कांद्याचा बाजार स्थिरावलेला दिसतो. कांदा बाजारावर मागील महिनाभरापासून सरकारच्या धोरणांचा दबाव दिसून येतो आहे.

अनिल जाधव

देशातील सोयाबीन बाजार दबावतच आहे. सोयाबीनची भावपातळी आजही ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती. तर बाजारातील आवक आवक सरासरी १ लाख ७० हजार क्विंटलच्या दरम्यान होती. बाजारातील आवक चांगली असल्याने दर टिकून आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचाही परिणाम देशातील बाजारावर दिसून येत आहे.

सध्याच्या भावात आवक काहीशी घटली तरी पुरेशी आहे. त्यामुळेही दरवाढीला काहीसा लगाम बसत आहे. बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर सोयाबीनलाही आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाची भावपातळी कायम आहे. देशातील बाजारात कापसाची सरासरी आक १ लाख ८० हजार गाठींच्या दरम्यान होत आहे. कापसाचे भाव कमी असतानाही उद्योगांना गरजेप्रमाणे कापूस मिळत आहे. त्यामुळे कापूस बाजारावर दबाव दिसून येतो, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

सध्या कापसाला सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील कापूस आवक जास्त आहे तोपर्यंत दरावरील दबाव कायम राहील आणि आवक कमी झाल्यानंतर बाजारात सुधारणा दिसून येईल, असा कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

टोमॅटोचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. तर काही बाजारात क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. बाजारातील टोमॅटो आवक आणखी काही दिवस या पातळीदरम्यान राहू शकते, असा अंदाज आहे.

पुढील काळात बाजारातील टोमॅटो आवक कमी होत जाण्याचा अंदाज आहे. मात्र टोमॅटोची मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे. याचा आधार टोमॅटो बाजाराला मिळू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत.

जिरा लागवड वाढल्यामुळे जिऱ्याच्या उत्पादनात मोठी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. याचा दबाव बाजारावर आला. त्यामुळे जिऱ्याचे वायदे मागील दोन महिन्यांमध्येच जवळपास निम्म्याने कमी झाले. सध्या जिऱ्याचा भाव स्थिरावला असला तरी भाव आधीच्या पातळीवर आला नाही.

जिऱ्याचे वायदे आता ३५ हजारांवर पोचले आहेत. तर बाजार समित्यांमधील दरपातळी ३५ हजार ते ३७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. जिऱ्याचा बाजार यापुढील काळात जिरा पिकासाठी वातावरण कसे राहते, यानुसार राहील. तर बाजारात जिरा आवक वाढल्यानंतर दरावरील दबाव वाढू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

कांद्याचा बाजार स्थिरावलेला दिसतो. कांदा बाजारावर मागील महिनाभरापासून सरकारच्या धोरणांचा दबाव दिसून येतो आहे. आता अनेक बाजारातील कांदा आवक हळूहळू कमी होत आहे. पण लेट खरिपाचा मालही चालू महिन्यापासून सुरु होणार आहे. याचा परिणाम कांदा बाजारावर दिसून येऊ शकतो.

पण सध्या कांद्याचा किमान दरही काहीसा वाढलेला दिसतो. सध्या कांद्याचा सरासरी भाव १ हजार ३०० ते १ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजारातील आवक मात्र आजही जास्तच दिसते. कांदा बाजारावरील हा दबाव आणखी काही आठवडे दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT