Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांद्याचे भाव टिकून; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आजचे तीळ दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, हिरवी मिरची आणि तीळ पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनवर दबाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील घट कायम आहे. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे कमी होऊन ९.८८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात नरमाई आली आहे. बाजारात नव्या मालाची आवक सुरु झाल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसातील घट कायम

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात आज भाव काहिसे कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कमी होऊन वायदे ७१.१४ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५६ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्याचे भाव स्थिर

कांद्याचे भाव मागील आठवडाभरांपासून बाजारांमध्ये स्थिर दिसत आहेत. वाढलेल्या भावात कांद्याला उठाव कमी दिसत आहे. तर भाव कमी झाल्यानंतर कांद्याची बाजारातील आवक कमी होत आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात चढ उतार दिसत आहेत. कालच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात काहिशी नरमाई आली होती. कांद्याचे भाव आज ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तिळाचे भाव स्थिर

तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहिशी नरमाई दिसून आली. देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे. त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे तिळाच्या भावावर काहिसा दबाव दिसून येत आहे. सध्या तिळाला बाजारात सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

हिरवी मिरची टिकून

राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव टिकून आहेत. बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहिशी वाढलेली दिसते. पण बाजारात मागणीही चांगली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे. बाजारात मिरचीचे भाव सध्या ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहिशी वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT