Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा दरात चढ उतार सुरुच; कापूस, सोयाबीन, आले तसेच काय आहेत कारले दर ?

Daily Commodity Rates : कांदा दरात सतत चढ-उतार होत असल्याने शेतकरी आणि ग्राहक दोघेही संभ्रमात आहेत. सोबतच, कापूस, सोयाबीन, आले आणि कारले यांसारख्या पिकांच्या बाजारभावांमध्येही चढ-उतार दिसून येत आहेत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात मोठे चढ उतार सुरु होते. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.२५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड २९५ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात मात्र चढ उतार सुरुच आहेत.

आज प्रक्रिया प्लांट्सनी खेरदीचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. बाजार समित्यांमधील दरपातळी मात्र ३ हजार ९०० ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार येऊ शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा भाव टिकून

मागील काही दिवसांमध्ये कांद्याच्या भावात पुन्हा चढ उतार पाहायला मिळाले. चार दिवसांपुर्वी कांदा भाव १५०० रुपयांच्याही खाली आले होते. मात्र दर कमी झाल्यानंतर बाजारातील आवकही काहीशी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. कांद्याला उठावही चांगला आहे.

त्यामुळे आज बाजारात कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल १६०० ते २ हजारांच्या दरम्यान मिळाला. बाजारातील आवक पुढील काळात काहीशी सुधारण्याची शक्यता आहे. याचा दरावरही परिणाम दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

आल्याचे भाव दबावातच

आल्याचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून आणखी दबावात आले आहेत. नव्या मालाची आवक सुरु झाल्यानंतर दर कमी झाले आहेत. यंदा राज्यात यंदा आले पिकाचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे आले उत्पादनात यंदा वाढ होईल, असा अंदाज आधिपासून व्यक्त केला जात होता. त्यानुसार बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढत गेला.

सध्या आल्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ५ हजारांचा भाव मिळत आहे. बाजारातील आवकेचा दबाव आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आल्याच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कारल्याला चांगला उठाव

राज्यातील बाजारात सध्या कारल्याला चांगला उठाव मिळत आहे. बाजारातील कारल्याची आवक कमी आहे. बाजारातील इतर भाजीपाल्याच्या दराचाही आधार कारल्याला मिळत आहे. कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे कारल्याला भावही चांगला आहे.

सध्या बाजारात कारली प्रतिक्विंटल ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले. कारल्याची आवक यापुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कापूस दबावातच

कापूस भावावरील दबाव आजही कायम होता. कापसाच्या भावात मोठे चढ उतारही होताना दिसत नाहीत. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर एका मर्यादेत स्थिर दिसत आहेत. त्यामुळे कापूस बाजारात मोठ्या घडामोडी घडताना दिसत नाहीत. तर संक्रांतीच्या दरम्यान कमी झालेली कापूस आवक आता पुन्हा वाढत आहे.

त्यामुळे देशातील बाजारात सध्या कापसाचा सरासरी भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील बाजारावर सध्या आवकेचा आणि कमी उठाव, या घटाकांचा दबाव आहे. आणखी दोन ते तीन आठवडे देशातील बाजारात कापसाची आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरपातळीही स्थिर राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT