Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे दर काय आहेत?

Market Update : आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, गहू आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात झालेली सुधारणा कायम आहे. ब्राझीलमध्ये आलेल्या पुरामुळे ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली. आज दुपारपर्यंत सोयाबीनचा भाव १२.४५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता.

तर सोयापेंडचे वायदे ३८४ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशात मात्र भावपातळी स्थिर आहे. सध्या सोयाबीन ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भावातील वाढ कायम राहील्यानंतर देशातही भाव सुधारू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत कापूस वायद्यांमध्ये सुधारणा झाली. तर देशातील बाजारात नरमाई आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव ७८.४७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते.

तर देशातील वायदे कमी होऊन ५७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. तर बाजार समित्यांमधील भावही स्थिर होते. बाजार समित्यांमध्ये कापसाला आज सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांदा निर्यातीतील अडथळे काही प्रमाणात कायम आहे. त्यामुले कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे. सरकारने कांदा निर्यातीबंदी उठवल्यानंतर कांद्याच्या भावात झालेली सुधारणा कमी झाली. सध्या सरासरी भावपातळी १४०० ते १७०० रुपयांच्या दरम्यान आहे.

सरकारने ४० टक्के निर्यातशुल्क लावल्यामुळे भारताचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाला. सरकारने निर्यात शुल्क काढल्यास निर्यात वाढून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात गव्हाची भावपातळी कायम आहे. गव्हाचे घटलेले उत्पादन आणि सरकारची खरेदी याचा गव्हाला आधार मिळत आहे. पण दुसरीकडे सरकारच्या धोरणांचाही दबाव दरावर दिसून येत आहे. सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत.

देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे. पण दुसरीकडे मागणी चांगली आहे. बाजारातील आवकच कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला.

सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Levels Drop: आठवडाभरात लघू प्रकल्पांत दोन टक्के, मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

Farm Road Issue: करमाळ्यातील शेतकऱ्यांचे बंद रस्ते तत्काळ मोकळे करा : नारायण पाटील

Agriculture Irrigation Management: सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आराखडा तयार करा

Cotton Rate: उद्योगांचा नफा कमी झाल्याने आयात शुल्क काढण्याची मागणी

Crop Damage Compensation: पावसाच्या नुकसानीपोटी ५.४० कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT